Korean Vlogger Kelly Molested On Video: दक्षिण कोरियन व्लॉगर ‘केली’ भारत दौऱ्यावर असताना, महाराष्ट्रातील कथितपणे मुंबईत एका रस्त्यावर व्हिडिओ काढत होती. यावेळी स्थानिकांशी संवाद साधत असताना एका व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून ही भीषण घटना तिच्या व्लॉगवर कैद झाली आहे यातूनच ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. केलीने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिथे वर वर हसून निघून जाण्याचा प्रयत्न केला पण तिची अस्वस्थता चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. याप्रकारच्या लोकांमुळे राज्याचेच नव्हे तर देशाचे नाव खराब होत आहे अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओमध्ये, व्लॉगर दुकानदारांशी बोलताना दिसते, तितक्यात अचानक एक पुरुष दुकानदाराला येऊन तिच्याबरोबर माझा फोटो काढ असे सांगतो. तेवढ्यात दुसरा माणूस येऊन तिला पकडतो. तो समोरच्या माणसाला सांगतो, “इतक्या लांब उभे राहू नकोस. तिला असं धर.” तिने स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही तो तिला धरून ठेवतो. “त्यांना मिठी मारायला आवडत असेल,” असं म्हणत केली तिथून निघून जाताना दिसते.

केलीने पोलिसांना त्रासदायक घटनेची तक्रार केली की नाही हे अद्याप समजलेले नाही. मात्र भारतीयांनी या भयानक घटनेबद्दल केलीची माफी मागून कमेंटबॉक्समध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे.

केलीच्या या व्हिडिओवर, “एक भारतीय नागरिक म्हणून मी माफी मागतो त्या मूर्खांनी तुझ्यासह असं गैरवर्तन केलं,” असे YouTube वापरकर्त्याने म्हटले आहे. तर “एक भारतीय म्हणून आम्हाला त्याच्या वागणुकीबद्दल खरोखरच खेद वाटतो. भारताकडून खूप प्रेम, सुरक्षित राहा,” असे आणखी एका वापरकर्त्याने म्हटले आहे. तर अन्य एका युजरने “केली, तू किती आनंदी आणि सकारात्मक आहेस हे मला आवडते! त्या माणसाने तुला चुकीचा स्पर्श केल्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. मला आशा आहे की यापुढे भारतात तूला फक्त चांगलेच लोक भेटतील.” अशी कमेंट केली आहे.

हे ही वाचा<< ८ महिने अंतराळात हरवलेले ‘ते’ दोघे सापडले; तिथे पोहोचलेच कसे? नासाने शेअर केला Video, दृश्य पाहून व्हाल थक्क

दरम्यान, गेल्या डिसेंबरमध्ये, एका २४ वर्षीय दक्षिण कोरियाच्या व्लॉगरचा खारमधील एका रस्त्यावर दोन पुरुषांनी पाठलाग करत छळ केला होता. ही घटना तिच्या लाईव्ह व्लॉगवर कैद झाली होती. मोबीन चांद मोहम्मद शेख (१९) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (२१) अशी संशयितांची नावे होती तेव्हा पोलिसांनी या आरोपींना पकडले, मात्र त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांवर जामीन मंजूर करण्यात आला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video south korean vlogger kelly harassed by man in maharashtra vulgarly touches an hugs asking other men to touch shocking svs