सोशल मीडियावर रोज कित्येक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. वारंवार चेतावणी देऊनही वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवतात ज्यामुळे अनेकदा अपघात होतो. सध्या अशाच एका घटनेत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लाल रंगाच्या ह्युंडाई कारने स्कूटरला जोरदार धडक दिल्यानंतर सुमारे ५०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे दिसते. रस्त्यावरून स्कूटर फरफटत असताना ठिणग्या उडाल्या आहे जे पाहून अंगावर काटा उभा राहत आहे.

हेही वाचा – Viral Video : लग्नानंतर पाठवणीच्यावेळी नवरी रडलीच नाही ! कुटुंबियांसमोर जे कृत्य केले ते पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू

ही घटना पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक लाल रंगाची हु्यूंडाई कार स्कूटरला त्याच्या बोनेटच्या खाली अडकल्याचे दिसते आहे. स्कूटरवरील प्रवासी रस्त्यावर पडले, मात्र कारच्या पुढील भागात स्कूटर अडकली अन् चालकाने ती रस्त्यावर फरफटत नेली. अनेकांनी चालकाला थांबण्याचे संकेत दिले, मात्र चालकाने गाडी अधिक वेगाने पुढे नेली. रस्त्यावर स्कूटरच्या घर्षणामुळे चक्क ठिणग्या उडत होत्या तरी त्याने गाडी थांबवली आहे. रस्त्यावरून जाणारे इतर प्रवासी गाडी चालकाला थांबण्याचा संकेत देतो परंतु चालक विनंतीकडे लक्ष देत नाही आणि उलट वाहनाचा वेग वाढवतो. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारचा पाठलाग केला आणि आरोपी चंद्रप्रकाश जो प्रयागराजचा रहिवासी आहे, याला अटक केली. जखमी स्कूटर प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

हेही वाचा –‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ धावत्या रेल्वेच्या छतावर धावतेय तरुणी, काळजात धडकी भरवणारा Video Viral

लखनऊमधील पीजीआय पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, जिथे कारने स्कूटरला धडक दिली होती, मीडिया रिपोर्ट्सनुसार. स्कुटरवरून दोघेजण मोहनलालगंजला जात होते. चालकाचे नाव चंद्र प्रकाश असे असून तो प्रयागराजचा रहिवासी आहे. आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. जखमी स्कूटरस्वारांना रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

Story img Loader