Accident viral video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलं आहे. कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरुप घरी पोहोचलेलं बरं, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील काही मंडळी या सल्लाकडे दुर्लक्ष करतात. अन् पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रेशातील लखनऊ येथे एका २३ वर्षीय तरुणाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटिव्ही व्हिडीओ समोर आला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये एक धक्कादायक अपघात कॅमेरात कैद झाला आहे. या अपघातामध्ये एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवाऱ्या मध्यरात्रीनंतर झाला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका वळणाला कारचा वेग इतका जास्त होता की ती रस्त्याच्या मध्यभाग असलेल्या डिव्हायरवरील खांबाला धडकली. धडक एवढ्या जोरात बसली ही हा खांबही रस्त्यावर पडला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mahakumbh vip arrangement
Mahakumbh: चेंगराचेंगरीत सामान्य भाविकांचा मृत्यू; दुसरीकडे VIP साठी विशेष व्यवस्था, इन्फ्लूएन्सरच्या व्हिडीओवर संताप
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
27 year old youth died of heart attack on field while practicing cricket in Kopar village of Virar East
क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; विरार येथील घटना
Rupali Bhosale
“यशाच्या शिड्या जिच्या जीवावर…”, ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसलेने दिल्या आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, “मी कायम…”
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
27 year old Punekar woman died in in paragliding accident in goa
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

वाढदिवस ठरला तरुणाचा मृत्यू दिवस !

या अपघातामध्ये निराला नगर येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या कारमध्ये हा तरुण एकटाच प्रवास करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण त्याच्या वाढदिवसाची पार्टी करुन घरी परत येत असताना रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात घडला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Drugs Video: धावत्या विरार लोकलमध्ये ‘दम मारो दम’; सहा मुले अन् एका मुलीचा प्रताप पाहून यूजर्स संतापले

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार लखनऊ महानगरपालिकेच्या झोन-४ च्या टीमने रस्त्यावर पडलेला पोल बाजूला केला. पोलिसांनी ही अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा पंचनामा सुरु आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, या तरुणाने मद्यप्राशन केलं होतं का यासंदर्भातील तपासही पोलीस करत आहेत.

Story img Loader