व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला आणि पुरुष चिडलेल्या गायीसमोर अचानक दुचाकी थांबवतात आणि संकटाला आमंत्रण देतात. मंगळवारी गुजरातमधील मोडासा येथील सहयोग चौकाजवळ एक भटक्या गायीने एका बाईकवरील महिलेवर जोरदार हल्ला केला. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपाजवळ बाईकवर आलेल्या जोडप्याचा पाठलाग करताना गाय दिसत आहे. यानंतर भटक्या गायीने महिलेला दुचाकीवरून खाली उतरण्यास भाग पाडले आणि तिच्यावर गंभीर हल्ला केला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका गायीने दुचाकीवरील महिलेवर हल्ला केल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पुरुष आणि एक महिला दुचाकीवरून जाताना दिसत आहे. त्यांच्यामागे एक गाय धावते आहे. अचानक पुरुष दुचाकी थांबवतो आणि मागे धावणारी गाय दुचाकीवर बसलेल्या महिलेला टक्कर मारते. गायीपासून वाचण्यासाठी महिला दुचाकीवरून उतरते आणि रस्त्यावर धावत सुटते. गाय देखील महिलेच्या मागे धावू लागते. शेवटी महिला गायीच्या तावडीत सापडते. गाय महिलेला शिंग मारून जमिनीवर पाडते आणि महिलेला पायाखाली तुडवते. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा – दुचाकीवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून चोरटा फरार, थरारक घटनेचा Video Viral

जमिनीवर पडलेली महिला स्वत:ला वाचवताना दिसत आहे. यावेळी शेजारी उपस्थित असलेल्या लोकांनी महिलेला वाचवण्यासाठी गायीचा हुसकवण्यास सुरू केला. कोणीतरी आरडाओरडा करून गाय दूर करण्याचा प्रयत्न करतो. महिलेचा पतीने मध्यस्थी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, शेवटी जवळच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारी काठी घेऊन आला आणि गायीला हुसकावले तेव्हाच गाय तेथून निघून गेली. या दुःखद घटनेत, महिलेला गंभीर दुखापत झाली आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. भटक्या गायीने महिलेवर हल्ला करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा – लग्न मंडपात भटजींना सांगितला WIFEचा अर्थ, जो ऐकून नवरा-नवरीला आवरेना हसू, पाहा मजेशीर Viral Video

एक्सवर घर के कलेश नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”या तरुणाने बाईक का थांबवली?” व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की तरुणाने बाईक थांबवल्यानंतरच गायीने हल्ला केला आहे. जर त्याने बाईक थांबवली नसती तर गायीच त्यांच्यावर हल्ला करू शकली नसती. त्यामुळे नेटकऱ्यांना देखील हा प्रश्न पडला आहे की, या तरुणाने बाईक का थांबवली असेल? यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा – कॅनडामध्ये टीम हॉर्टन्स येथे नोकरीसाठी भारतीय विद्यार्थींची लागली मोठी रांग, पाहा Video Viral

एकाने सांगितले की,”त्याने दुचाकी का थांबवली? कारण ते करणे योग्यच होते. गाय थांबला. ती पळून गेल्यानंतरच तिच्यावर हल्ला सुरूच होता.” दुसरा म्हणाला की, “तुम्ही तुमचे वाहन थांबवले की, फक्त कुत्रे तुमचा पाठलाग करणे थांबवतात, त्याला वाटले असेल की गाय देखील थांबेल”

तिसरा म्हणाला, मला वाटले की हा सगळा मूर्खपण फक्त हॉरर चित्रपटात दाखवला जातो, पण खऱ्या आयुष्यात? त्याने आपली बाईक का थांबवली आणि नंतर त्या महिलेने त्याला बाईक पुढे नेण्यास सांगण्याऐवजी खाली का उतरली असेल?