Viral Video Today: मुंबई लोकलमधून प्रवास करताना नेहमी ऐकू येणारी घोषणा म्हणजे ट्रेनमधून उतरताना गाडीचे पायदान व फलाटामधील अंतराकडे लक्ष द्या. तीन तीन भाषांमध्ये सांगूनही अनेकदा प्रवासी अगदी कानावरून हवा जावी अशा पद्धतीने ही घोषणा वजा सूचना दुर्लक्षित करतात. पण असं करणं आता एका मुलीच्याजीवावर बेतलं आहे. अंगावर काटा आणेल असा एक रेल्वे प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहायलाच हवा जेणेकरून आतातरी रेल्वेच्या सूचना आपण गांभीर्याने घ्यायला सुरु करू.नेमकं काय घडलं चला पाहुयात..
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुणी ट्रेनमधून उतरताना दिसत आहे. गणवेशावरून व वेण्यांवरून शाळा- कॉलेजची विद्यार्थिनी असावी असे दिसतेय. ट्रेनमधून उतरताना अचानक या मुलीचा पाय घसरतो पण रेल्वे प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील अगदी छोट्या जागेत ही तरुणी पडते व अडकून बसते. रेल्वे पोलीस समोरच असल्याने त्यांनी ट्रेन थांबवली व या मुलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केला. बराच वेळ ही तरुणी त्या जागेत अडकली होती. जेव्हा तिला बाहेर काढलं तेव्हा तिला वरवर दुखापत झाली नव्हती मात्र खरचटलं असल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. पण डॉक्टरकडे गेल्यावर तिच्या अंतर्गत अवयवांना गंभीर जखम झाल्याचे निदान झाले.
सद्य माहितीनुसार एमसीएची विद्यार्थिनी एम शशिकला हिचा गुरुवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वेच्या इतर विभागांसह रेल्वेच्या जवानांनी दीड तास चाललेल्या बचावकार्यानंतर 20 वर्षीय विद्यार्थिनीला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामधल्या जागेतुन बाहेर काढण्यात आले होते. पण या वेळात तिला अंतर्गत अवयवांना दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.
रेल्वेच्या प्लॅटफॉर्ममध्ये अडकली तरुणी..
हे ही वाचा<< बापरे! तिखट खाल्ल्याने महिलेच्या चार बरगड्या तुटल्या; डॉक्टरही झाले थक्क, पाहा नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडीओ हा विशाखापट्टणम येथील असल्याचे समजत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यात रेल्वेलाही दोष दिला आहे. प्रवासी बेजबाबदार असणे हा एक मुद्दा झाला पण काही ठिकाणी रेल्वे व प्लॅटफॉर्ममधील अंतरच खूप जास्त असते त्यामुळे असे अपघात होतात. या दोन्ही मध्ये नेमकी चूक कोणाची व यावर काय उत्तर शोधता येईल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.