न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आय सी सी महिला विश्वचषक २०२२ (icc women’s world cup 2022) ११ वा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कांगारू संघाने यजमान न्यूझीलंडसमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. सामन्यादरम्यान न्यूझीलंड संघाची खेळाडू मॅडी ग्रीनने ऑस्ट्रेलियन फलंदाज एलिस पेरीचा सुपरमॅन सारखा कॅच पकडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पेरी ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६८ धावा करून परतली आणि ती तिच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॅडी ग्रीनने ४५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा झेल घेतला. ताहलिया मॅकग्रा सोबत शतकी भागीदारी करणारी एलिस पेरी आक्रमक पद्धतीने फलंदाजी करताना दिसली. तिने आपले अर्धशतक पूर्ण केले होते आणि शेवटच्या षटकांमध्ये ती पॉवर हिटिंग मूडमध्ये होती. ४५ व्या षटकात, ली तैहूच्या शेवटच्या चेंडूवर, पेरीने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारून धाव घेण्याचा प्रयत्न केला, स्थिरावलेली मॅडी ग्रीन तिच्या उजवीकडे धावली आणि मग हवेत शानदार उडी मारत झेल पूर्ण केला. हा अप्रतिम झेल पाहिल्यानंतर समालोचकांसह प्रेक्षकही अवाक् झाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबानंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

(हे ही वाचा: Pune Metro: पुणे मेट्रोतील दोन बायकांचा भांडणाचा मजेशीर Video Viral)

एलिस पॅरी बाद झाल्यानंतर अॅशले गार्डनरने गोल करण्याची जबाबदारी घेतली. गार्डनने १८ चेंडूत ४ चौकार आणि तब्बल ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. एक वेळ अशी होती जेव्हा ऑस्ट्रेलियाने ३० व्या षटकात ११३ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कांगारू संघ अडीचशे धावांचा टप्पा पार करू शकेल, असे वाटत नव्हते. पण पेरी, ताहलिया आणि गार्डनर यांच्या खेळीमुळे ते शक्य झाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video superwoman onces see maddie green this catch the audience including the critics are amazed ttg