Suryakumar Yadav Trending Video: टी २० विश्वचषकात भारतीय संघात सूर्याची तेजस्वी खेळी पाहायला मिळाली होती. टी २० इनिंगमधील सर्वात यशस्वी खेळाडूंच्या तोडीचा खेळ सूर्यकुमार यादवने २०२२ च्या एका विश्वचषकातच दाखवून दिला आहे. जगभरातील क्रिकेटपटू व चाहत्यांनी सूर्या सुप्रमसी समोर अक्षरशः हात टेकले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्यासह अनेकांनी सूर्याच्या कौतुकाचे पूल बांधले आहेत. पण मैदानावरील हा चमकता सूर्या घरी मात्र बायकोसमोर सर्वसामान्य नवऱ्यांसारखाच आहे हे त्याच्या एका पोस्टवरून समजतेय. सूर्या व त्याची पत्नी देविशा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा गोड गोंडस रील पोस्ट करत असतात. यातीलच एका रीलमध्ये त्यांनी १३ खाजगी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंस्टाग्रामवर अनेक कपल चॅलेंज व्हायरल होत असतात, यातीलच एक म्हणजे हा १३ प्रश्नाचा ट्रेंड आहे. सूर्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या रीलमध्ये हा ट्रेंड फॉलो करत देविशासह स्वतःबद्दलच्या तसेच त्या दोघांच्या प्रेमाविषयीच्या १३ प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली आहेत.

सूर्यकुमार यादवला बायकोने टाकली प्रश्नांची गुगली

हे ही वाचा >> टीम इंडियाचा तळपता सूर्या! सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित, म्हणाला, “मी रबरी बॉल..”

या ट्रेंडची गंमत म्हणजे यात जोडप्याला एकमेकांकडे न बघताही एकमेकांची योग्य उत्तरे ओळखता येतात का हे पाहायला मिळते. या व्हिडिओतून सुर्या आणि देविशाची परफेक्ट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सूर्याने लॉकडाऊनच्या काळात पोस्ट केला होता. मागील काही सामन्यातील सूर्याच्या खेळावरून त्याची फॅन फॉलोईंग तुफान वाढली आहे. अर्थात अनेकांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात रस वाटू लागला आहे. म्हणूनच हा रील आता पुन्हा ट्रेंड होत आहे.

दरम्यान, सूर्याने २०१६ मध्ये कोरिओग्राफर देविशा शेट्टीसह लग्नगाठ बांधली होती. सूर्या आणि देविशा आपल्या मुंबईतील आलिशान आशियानात आपल्या पाळीव प्राण्यांसह राहतात.