-अंकिता देशकर

Swami Vivekananda Viral Video: द इंडियन एक्सप्रेसला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्स वर व्हायरल होताना दिसला. हा व्हिडिओ Whatsapp आणि युट्युब वर देखील व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडिओ मध्ये दावा करण्यात येत होता कि हा स्वामी विवेकानंद यांचा एक दुर्मिळ व्हिडिओ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: स्वामी विवेकानंद यांचे दुर्मिळ फोटो

स्वामी विवेकानंद यांचा दुर्मिळ व्हिडिओ सांगून व्हायरल होत असलेला व्हिडिओ आम्हाला बऱ्याच सोशल मीडिया यूजर्सने शेअर केल्याचे दिसले.

तपास:

द इंडियन एक्सप्रेसने तपासाची सुरुवात व्हायरल व्हिडिओ इन्व्हिड टूल मध्ये अपलोड करून केली. इन्व्हिड टूल वापरून आम्ही विविध किफ्रेम्स अर्थात स्क्रिनग्रेब्स मिळवले. एका शेवटच्या स्क्रिनग्रेब वर ‘MIRC@SCEDU’ असा वॉटरमार्क असल्याचे लक्षात आले.

आम्ही हे वॉटरमार्क गूगलचा वापर करून शोधण्यास सुरुवात केली. त्यात आम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना ची वेबसाईट आणि त्यातिल ‘मुविंग इमेज रिसर्च कलेक्शन’ हे सेक्शन सापडला.

https://sc.edu/about/offices_and_divisions/university_libraries/browse/mirc/index.php

आम्ही याच्या सर्च बॉक्स मध्ये, ‘स्वामी विवेकानंद’ असे शोधले, पण आम्हाला याचे काहीच उत्तर मिळाले नाही.त्यानंतर आम्ही, ‘स्वामी’ हा शब्द सर्च बॉक्स मध्ये शोधला, त्याद्वारे आम्हाला एक व्हिडिओ मिळाला.

https://digital.tcl.sc.edu/digital/collection/MVTN/id/221/rec/1

आम्हाला या परिणामांमध्ये, व्हायरल व्हिडिओ सापडला, ज्याचे शीर्षक होते, ‘Swami Yogananda of India’.

स्वामी आणि त्यांचा पक्ष न्यूयॉर्कमधील पर्शिंग स्क्वेअरच्या बाजूने फिरताना, शक्यतो १९२३ मध्ये शहराच्या भेटीदरम्यान. आम्हाला सुमारे 35 सेकंदांनंतर व्हायरल झालेल्या क्लिप मधील दृश्य दिसले.

तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन (मुख्यालय), हावडा, पश्चिम बंगालच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी केली की व्हायरल दावा खोटा आहे. स्वामी विवेकानंदांचे कोणतेही व्हिडिओ नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याची फक्त कृष्णधवल चित्रे उपलब्ध आहेत. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन हेडक्वार्टर्स ने ई-मेल द्वारे आम्हाला सांगितले कि विडिओ मध्ये परमहंस योगानंद आहेत, योगदा सत्संग सोसायटीचे संस्थापक, स्वामी विवेकानंद नाही.

हे ही वाचा<< “सचिन तेंडुलकरमुळे १००९ धावा करणाऱ्या ‘त्या’ खेळाडूवर अन्याय…”अर्जुनचा फोटो लावून संतापजनक पोस्ट

निष्कर्ष: व्हायरल होत असलेली रील स्वामी विवेकानंदांचा दुर्मिळ व्हिडिओ नाही. व्हायरल व्हिडिओ स्वामी योगानंद यांचे १९२३ साली न्यू यॉर्क दौऱ्याचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video swami vivekananda rare speech viral clip how swami look when he was young ramkrishna mission gives real answer svs
Show comments