सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये भटक्या कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. पाळीव कुत्र्यांची काळजी त्यांचे मालक घेतात, मात्र त्या तुलनेत भटक्या कुत्र्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी त्यांना खाण्यासाठी तर कधी भर पावसात निवारा शोधण्यासाठी खूप कसरत करावी लागते. पण अशा कुत्र्यांनाही मदत करणारे अनेक प्राणीप्रेमी असतात. सध्या अशाच एका प्राणीप्रेमी तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने केलेली कृती पाहून अनेकजण त्याचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. हो कारण या व्हिडीओमध्ये तरुणाने एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक धाडसी तरुण वाहनांची ये-जा सुरु असणाऱ्या रस्त्यावर अडकलेल्या आणि घाबरलेल्या कुत्र्याच्या पिल्लासाठी देवदूत बनून आल्याचं दिसत आहे. कारण या रस्त्यावर खूप वाहनांची गर्दी असून ती भरधाव वेगाने इकडून तिकडे जाताना दिसत आहेत. यावेळी एक कुत्रा त्या वाहनांच्यामध्ये अडकलेला आहे जो खूप घाबरेला दिसत आहे. यावेळी एक तरुण त्या कुत्र्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी वाहनांच्यामधून पळत जातो आणि त्या कुत्र्याला हाताने उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन येतो. जे पाहून अनेक नेटकरी भावूक झाले आहेत.

हेही पाहा- भरधाव रेल्वे पकडणं तरुणाला पडलं महागात, अचानक पाय घसरला अन् रुळावर पडला, थरारक VIDEO आला समोर

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ गुड न्यूज करस्पाँडंट नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकजण हा तरुण त्या भटक्या कुत्र्यासाठी देवदूत बनून आल्याचं म्हणत आहे. तर अनेकजण त्याला खरा प्राणी प्रेमी म्हणत आहेत. एका युजरने अजूनही माणुसकी शिल्लक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एका महिलेने हा शूर आणि दयाळू तरुण असल्याचं म्हटलं आहे. सध्या कुत्र्याला मदत करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ ४१ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video teen turns angel to save terrified puppy he rushed through the vehicles without caring for his life jap