Railway accident video viral : रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक तेलंगणामधील धक्कादायक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. ३४ सेकंदाचा हा व्हिडिओ हृद्याचा ठोका चूकवणारा आहे.
तेलंगणाच्या विकाराबाद रेल्वे स्टेशनवर प्रवासी घसरून प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या फटीत पडला. त्यानंतर तो प्रवासी फरफटत गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक प्रवासी धावती ट्रेन पकडण्याच्या नादात प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या फटीत पडला. दरम्यान प्रवाशांनी तातडीने ही ट्रेन थांबवली. त्यानंतर फटीत अडकलेल्या त्या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी प्लॅटफॉर्म फोडण्यात आला. सतर्क प्रवासी, आरपीएफ आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे तो माणूस पडून चमत्कारिकरित्या बचावला. नंतर त्या प्रवाशाला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही ट्रेन बिदर ते यशवंतपूर धावत होती आणि या घटनेमुळे ट्रेनला जवळपास ९० मिनिटे उशीर झाला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> ‘रामू बोलू शकला असता तर…’ आनंद महिंद्रा बैलाला का म्हणाले, मोटिव्हेशनल स्पीकर्सपेक्षा चांगला! पाहा Video
ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. प्रवाशाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, ही चूक त्या व्यक्तीची आहे. तर दुसऱ्या एका युजरनं, इतर प्रवाशांचं कौतुक केलं आहे.