गावासह शहरातही बिबट्या आणि इतर वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वन्यप्राण्यांची दहशत वाढत चालली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आज मनुष्य आणि प्राण्यांची वस्ती यांमधील अंतर कमी होत आहे. अनेक ठिकाणांवरून वाघ, बिबट्या, चित्ता गावात फिरतानाच्या घटनांची माहिती मिळत आहे. एवढेच नाही, तर हे धोकादायक प्राणी घरात घुसून माणसे, पाळीव प्राणी यांच्यावर हल्ला करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आणखी एक घटना नुकतीच समोर आली आहे; ज्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही गोष्ट खरी आहे की प्राणी असो किंवा माणूस भीती सर्वांनाच वाटते. कधी रस्त्यावर, कधी गावात बिबट्या शिरल्याच्या बातम्या येत राहतात. शिकार न मिळाल्याने बिबट्या आपला मूळ अधिवास सोडतो आणि शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत येतो. असाच एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे; ज्यामध्ये बिबट्या चक्क स्टाफ क्वार्टरमध्ये शिरला असल्याचे दृश्य समोर आले आहे.

हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर)च्या हॅण्डल @aniltalwar2 वर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “१० वाजता खमिरिया, जबलपूरच्या स्टाफ क्वार्टरमध्ये.” ही घटना जबलपूरमधील आहे. व्हिडीओमध्ये चार बिबट्या गेटजवळ फिरताना दिसत आहेत. कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला बिबट्याने पाहिले आणि लगेचच गेटमधून उडी मारून पळ काढला; मात्र उर्वरित तीन बिबटे तिथेच फिरत असल्याचे दिसते.

काही वेळाने आणखी दोन बिबट्या एकामागून एक गेटच्या बाहेर उड्या मारतात; पण एक बिबट्या गेटच्या वर बसला आहे. तो थोडा वेळ तिथेच राहतो आणि मग तोही तिथून उडी मारतो. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

या व्हिडीओवर लोक जोरदार कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “असे दिसते की, एंट्री करण्यापूर्वी त्यांचे आय-कार्ड तपासले गेले नाही.” दुसऱ्या युजरने लिहिले, “व्वा! संपूर्ण बिबट्याचे कुटुंबच येथे आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे, “ही मोफत सफारीची बाब आहे.” हा व्हिडीओ जबलपूरचा नसून, महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या सेक्टर ६ चा असल्याचा दावा काही युजर्सनी केला आहे.