Heartwarming Video : आजी नातवंडाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी आणि मैत्री दिसून येते. आज्जी नातवंडावर जीव ओतून प्रेम करते. नातवंडाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी वाट्टेल ते करते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजी नातवाचा हा गोड व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आज्जीने नातवाला चक्क देवघरात बसवले आहे आणि त्याची अतिशय प्रेमाने आरती करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांची आज्जी आठवेल तर काही लोकांना बालपणीच्या गमती जमती आठवतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकला देवघरात बसलेला आहे अर्थात आज्जीने त्याला देवघरात बसवले आहे आणि त्याला हाताने ओवाळत आज्जी आरती गाताना दिसतेय. आज्जी गणपतीची आरती गाताना दिसते. आरतीचं एक कडवं गायल्यानंतर आज्जी नातवाच्या पाया पडते आणि म्हणते, ” गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया” त्यानंतर आज्जी त्याचा लाड करते. या व्हिडीओत आज्जीचे नातवाविषयीचे प्रेम पाहून कोणीही थक्क होईल.
हेही वाचा : Video: आधी सिक्सर मारला, मग क्रिझवर कोसळला; ३२ वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू
पाहा व्हायरल व्हिडीओ (watch Viral Video)
sheru_96k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही पण तुमच्या आज्जीला असाच त्रास देता का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशी आज्जी सगळ्या नातवाच्या नशिबात नसते खुप छान आहे आज्जी नातवाचे प्रेम” तर एका युजरने लिहिलेय, “देव्हाऱ्यात देव बसला पण नैवेद्य. कुठाय आजी” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझा मुलगा लहानपणी असाच बसला होता नविन मंदिर तयार केले होते तेव्हा” एक युजर लिहितो, “आजी ही मुलांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर पान असते. माझी मुलगी माझ्या आईला प्रचंड त्रास देते. त्याचा १०% जरी आम्ही भवा बहिणींनी दिला असता तर आईने चोप चोप धुतला असता. पण नातीसाठी माझी आई काहीही सहन करते.” तर एक युजर लिहिते, “आजीने गणपती बाप्पांना बरोबर ओळखलं” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.