आपल्या देशातील लोक देशी जुगाड करण्यात खूप प्रसिद्ध आहेत. अनेक लोकं अवघड काम सोपं आणि पटकन व्हावं यासाठी जुगाडांचा शोध लावतात. शिवाय आजकाल अनेक लोकांनी आपली अवघड कामं सोपी करण्यासाठी केलेल्या विविध जुगाडांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकदा आपण थक्क होतो. शिवाय असे जुगाड बनवणाऱ्यांच्या बुद्धीचं कौतुक करतो. यामध्ये अनेकजण ट्रॅक्टर आणि बाईकच्या सहाय्याने असे अनोखे आणि भन्नाट जुगाड करतात ज्याचा आपण विचारही करु शकत नाही.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका शेतकऱ्याने तलावातील पाणी बाहरे काढण्यासाठी अनोखा जुगाड केल्याचं पाहायला मिळत आहे. या जुगाडाचा व्हिडीओ पाहून काही लोक बाईकचा गैरवापर होत असल्याचं म्हणत आहेत. तर दुसरीकडे अनेक लोक या जुगाडचे तोंडभरुन कौतु करत आहेत.
हेही पाहा- चिमुकल्याचं भलतं धाडस! अजगराला पकडण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात; थरारक VIDEO व्हायरल
व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एका तलावातील पाणी काढण्यासाठी एक पाईप जोडली आहेत. पाईपचे एक टोक बाईकला जोडले असून दुसरे टोक तलावातील पाण्यात आहे. यावेळी बाईक सुरु करताच तलावातील पाणी बाहेर येताना दिसत आहे. या भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ @makhankhokhar_vlog नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर २२ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. तर अनेक नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलं, “जुगाड करणाऱ्याला सलाम!” दुसऱ्याने लिहिलं, “बाईकचा गैरवापर होत आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “बाईक बनविणाऱ्या कंपनीने तिचा वापर पाणी काढण्यासाठी केला जाऊ शकतो, असा विचारही केला नसेल.”