दिवाळीच्या दिवसांमध्ये रांगोळीचे, वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. त्यातच फटाके फोडणाऱ्या लोकांचे अनेक मजेशीर व्हिडीओही तुफान व्हायरल होतात. या व्हिडीओमधील लोकांना अतिशय मजेशीर पद्धतीने फटाके फोडताना आपण पाहू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रॉकेट फटका हातातच फोडणाऱ्या मुलांबरोबर जे झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणे कठीण जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक भागातील दोन मुलं फटाके फोडत होते. यावेळी यातील एका मुलाने रॉकेट हातात धरले होते तर दुसरा मुलगा रॉकेटची वात पेटवत होता. वात पेटवल्यावर मुलाने हातातील रॉकेट रस्त्यावर फेकून दिला. मात्र त्यांनी केलेली कृती त्यांच्यावरच पलटली. रस्त्यावर फेकलेल्या या रॉकेटने पेट घेतला आणि ते पळणाऱ्या मुलांच्या मागे गेले. ज्याने या रॉकेटची वात पेटवली त्या मुलाच्या सदऱ्यामध्ये हे रॉकेट घुसले.

Video : चालत्या गाडीमधून करत होते फटाक्यांची आतिषबाजी; यानंतर पोलिसांनी जे केलं ते आयुष्यभर विसरणार नाहीत

या मुलांनी रॉकेटची वात पेटवली आणि हे रॉकेट तसेच रस्त्यावर टाकून तिथून पळ काढला. मात्र रॉकेट पेटले आणि ते पळणाऱ्या मुलांच्याच मागे लागले. यावेळी फटक्याची वात पेटवणाऱ्या मुलाच्या सदऱ्यात हा रॉकेट शिरला. मुलाचा सदरा जळला आणि त्याला छिद्र पडले. मात्र सुदैवाने या मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही.

फटाके फोडत असताना काळजी घेणे अतिशय आवश्यक असते अन्यथा आपल्याला इजा होऊ शकते. मात्र काही मुलं उगाचच असे स्टंट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यानंतर त्यांचीच फजिती होते. असाच काहीसा प्रकार या मुलांबरोबर घडला. सोशल मीडियावर ही घटना तुफान व्हायरल झाली आहे. काही लोक याला फेक स्टंट म्हणत आहेत, तर काहीजण या मुलांवर टीका करत आहेत.