Viral Video: तुम्ही एखाद्या रस्त्यावरून जात आहात, अचानक तुम्हाला फूटपाथला खालून कोणीतरी धडक देत असल्याचे आवाज आले तर तुम्ही काय अवस्था होईल? विचार करूनही घाबरगुंडी होईल असा हा प्रकार भारतात खरोखरच घडला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे लक्ष सुद्धा या घटनेकडे वेधले गेले आहे. भारतातील एका फुटपाथच्या खालून अत्यंत भीतीदायक असा आवाज येत होता अशावेळी काही लोकांनी हिंमत करून तो फूटपाथ खणून पाहायचे ठरवले आणि मग जे काही समोर आलं ते पाहून सर्वच उपस्थिती घाबरून गेले. नेमका हा प्रकार काय हे पाहूया..

@mksinfo.official या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला तब्बल दहा लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. आपण यामध्ये पाहू शकता की काही व्यक्ती या फूटपाथ खणत आहेत. फूटपाथ खणल्यावर काहीच क्षणात खालून एक महाकाय मगर बाहेर येते. या मगरीला बघूनच सर्वांची घाबरगुंडी उडालेली असताना अचानक दुसरी आणि पाठोपाठ तिसरी मगर सुद्धा बाहेर येण्यासाठी धडपडताना दिसते. विशेष म्हणजे या सर्व मगरी जिवंत असतात आणि फूटपाथखालून बाहेर पडताच चक्क वेगाने पळू लागतात. हा प्रकार बघून एखादा शुद्धीत असणारा माणूस तर पार हादरूनच जाईल असेही नेटकरी म्हणत आहेत.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर

Video: फूटपाथ खणताच निघाल्या मगरी

हे ही वाचा<< चुकीच्या कॅबमध्ये बसल्याने माथेफिरू उबर ड्रायव्हरची महिलेला भयंकर शिक्षा; CCTV मध्ये कैद झाला घटनाक्रम

दरम्यान, मगरी पाहून घाबरलेली मंडळी जेव्हा थोडी स्थिरावली तेव्हा त्यातील लाल कपडे घातलेला एक माणूस पहिल्या मगरीला नियंत्रित करण्यासाठी पट्ट्याने अडवत असल्याचे पाहायला मिळतेय. यानंतर मात्र हा प्रकार बघून येणारे जाणारे पादचारी हसताना दिसतात. आता या मगरी तिथे नक्की पोहोचल्या तरी कशा आणि जमिनीच्या खाली त्या जिवंत कशा राहिल्या हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Story img Loader