Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हसवतात काही रडवतात तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटतं. एकेकाळी पोलिसांचं नाव जरी घेतलं तरी धडकी भरायची मात्र आत्ताची तरुणाई पोलिसांनाही घाबरत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना घडली यामध्ये एका तरुणानं चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यामध्ये नेमकं कोण चुकलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात बडागाव धसन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरगवान गावात घडली. रविवारी रात्री झालेल्या एका रस्ता अपघातानंतर याची सुरुवात झाली, ज्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५० वर्षीय गुरका लोधी नावाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना ही बातमी समजली ज्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी खरगापूर-बडेगाव रस्ता रोखून धरत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच बडेगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनु मेघा गुप्ता दुबे घटनास्थळी पोहोचून याची दखल घेतली. मात्र, परिस्थिती चिघळली आणि वादात गुप्ता यांनी तरुणाला चापट मारली. त्यानंतर तरुणानंही प्रत्युत्तर देत महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली. या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली, पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून घटनास्थळावर नियंत्रण मिळवले. ग्रामस्थांना शांत करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आव्हानात्मक असल्याचे दिसून आले आणि शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले.
मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात सोमवारी ही घटना घडल्याने जिल्ह्यातील पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं सुरुवातीला तरुणाच्या कानाखाली मारली त्यानंतर संतापलेल्या तरुणानंही महिला पोलीस अधिकाऱ्याला कानाखाली लगावली. बाचाबाचीच्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि स्थानिक यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचं दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा यामध्ये नेमकं कोण चुकलं?
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अशी वेळ कुणावरच येऊ नये; लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाच्या मृत्यूचा थरार, नेमकं काय घडलं?VIDEO आला समोर
‘पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू’
पोलिसांच्या उशीरा प्रतिसादामुळे जखमी शेतकऱ्याला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, ज्यामुळे त्याचे प्राण गेले असा ग्रामस्थांचा आरोप आहे. या निष्काळजीपणामुळे त्यांच्यातला संताप वाढत गेला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे हिम्मतच कशी होते?” तर काहींनी याला पोलिसच जबाबदार असल्याचं म्हंटलंय.