अंकिता देशकर

Train Accident Viral Video: लाईटहाऊस जर्नालिज्मला रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. हा व्हिडिओ भारतातील वापरकर्त्यांनी शेअर केला असून, भारतात आणखी एक रेल्वे अपघात झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Elderly Man Narrowly Escapes Death Before Vande Bharat Swooshes By shocking video
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू
viral video girl lost balance while get in the moving train will be shocked to see what happened next
भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

काय होत आहे व्हायरल?

Amit Yadav5683 नावाच्या युट्युब चॅनेल ने हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता.

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओमधून काही स्क्रीन मिळवून आमचा तपास सुरू केला. आम्ही काढलेल्या फ्रेम्सवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च केले. इथून आम्हाला @karawanghitzz या इंस्टाग्राम हँडलची माहिती मिळाली. या हँडलवर १८ जुलै रोजी हाच व्हिडिओ अपलोड केला होता.

या व्हिडिओच्या कॅप्शनची भाषा इंडोनेशियन होती आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘आशा आहे की कोणतीही जीवितहानी झाली नाही, सेमरंगमधील घटना’. म्हणून मग आम्ही गूगल कीवर्ड शोध सुरू केला. हा रेल्वे अपघात जुलै २०२३ मध्ये झाला होता आणि आम्हाला त्याबद्दल अनेक बातम्या आढळल्या.

https://www.wionews.com/world/video-indonesia-passenger-train-crashes-into-trailer-truck-causes-fiery-explosion-one-injured-617537
https://www.kompas.id/baca/english/2023/07/18/en-kereta-api-tabrak-truk-di-semarang-satu-penumpang-terluka
https://www.theindonesia.id/news/2023/07/20/145925/passenger-train-crashes-into-trailer-truck-in-semarang-causes-explosion

आम्हाला या घटनेचे व्हिडिओ देखील सापडले.

निष्कर्ष: लेव्हल क्रॉसिंगवर ट्रकला ट्रेन धडकल्याचा व्हिडिओ भारतातील नसून इंडोनेशियातील सेमरंग शहरातील आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.