Train Viral Video: भारतीय आणि जुगाड हे समीकरण वर्षानुवर्षे कायम आहे. सर्वाधिक जुगाड हे सार्वजनिक वाहतुकीदरम्यान दिसून येतात त्यात ट्रेन मधील प्रवाशांची डोकी तर ज्या वेगाने चालतात त्याला काही तोडच नाही. मुंबई लोकलमध्ये जागा पकडण्यासाठी केली जाणारी धडपड तर अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असते. आता सुद्धा अशाच एका रेल्वे स्थानकातील व्हिडीओ इंटरनेटवरील मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे. इन्स्टाग्राम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या तुफान व्हायरल व्हिडिओची कमाल चर्चा आहे. यामध्ये एक तरुणी डोक्याचा कमाल वापर करत ट्रेनमधील गर्दीवर मात करून जागा पकडताना दिसत आहे. खरंतर जुगाड म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडीओ प्रवाशांची दयनीय अवस्था सुद्धा दर्शवतोय त्यामुळे अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करताना रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे. नेमकं असं या व्हिडिओमध्ये आहे तरी काय..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानकावरील हा व्हिडीओ असल्याचे समजतेय. ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी असतानाच काही प्रवाशांनी डोकं लावून आपत्कालीन खिडक्यांमधून आत शिरण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एका तरुणीने ज्या चपळाईने ट्रेनमध्ये प्रवेश घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, काहींनी प्रवाशांसाठी खिडक्यांमधून डब्यांमध्ये प्रवेश करणे कसे धोकादायक आहे यावर भाष्य केले, तर काहींनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी भारतीय रेल्वेच्या एक्स प्रोफाइलला टॅग केले.

हे ही वाचा<< गायी वाहून नेणारं भारतीय मालवाहू जहाज हुथींच्या ताब्यात? कत्तलीसाठी नेत असल्याचा गंभीर दावा, खरं काय?

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या कॅप्शननुसार, या गर्दीचे कारण ट्रक चालकांनी अति कठोर समजल्या जाणार्‍या नवीन ‘हिट-अँड-रन’ कायद्याला विरोध करत सुरू केलेला संप आहे. संपाचा परिणाम उज्जैनमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवला, जिथे हजारो यात्रेकरू बसच्या अनुपलब्धतेमुळे अडकून पडले होते. जेव्हा टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा चालकांनी संपाला पाठिंबा दर्शविला तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली आणि शेवटी लोकांनी रेल्वे स्थानकातच अधिक गर्दी केली.

(टीप: वरील लेख हा व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे, लोकसत्ता या दाव्याची पुष्टी करत नाही)