सोशल मिडीयावर रोज नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या व्हिडीओला नेटीझन्स विशेष पसंती देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बैलाचे आयुष्य जवळजवळ सिंहाच्या ताब्यात होते; मात्र हुशारी दाखवत बैलाने आपला जीव वाचवला. या व्हिडीओवर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसते की, रात्रीच्या वेळी एका चौकात एक बैल उभा होता. तेव्हा तिथे २ सिंह येतात आणि त्या बैलाला दोन्ही बाजूंनने घेरतात. काही वेळासाठी बैलाला समजत नाही नक्की काय झालं ते, नंतर ते एकमेकांशी भिडतात. सांगितलं जात आहे की ही घटना जूनागढ़च्या हडमतीया या गावातील आहे जिथे, लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. बैलाची शिकार न करताच त्या दोन्ही सिंहाना परत जाव लागलं.

(हे ही वाचा: कृतज्ञता! रस्ता ओलांडण्यासाठी गाडी थांबवणाऱ्याचे हत्तीने अनोख्या पद्धतीने मानले आभार; Video Viral)

(हे ही वाचा: पिंजऱ्याचे गेट उघडताच सिंहाने केअरटेकरवर मारली उडी अन्… बघा Viral Video)

गावाच्या बाजूला असलेल्या जंगलातून अनेकदा रात्रीच्या वेळी सिंह शिकार करण्यासाठी येत असतात. परंतु हे पहिल्यांदा झालं की ही घटना कैमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ memewalanews नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही घटना २१ डिसेंबरच्य रात्री ११ वाजता घडली असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसून येत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video two lions surrounded a bull in a human habitation so you see what happened ttg