Little Baby With Mom Viral Video: सोमवार आणि नोकरदार मंडळींचं रडारडीचं नातं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सोमवार न आवडण्यासाठी तुम्ही ऑफिसलाच जाणार्यांपैकी एक असायला हवे असे नाही. उलट सोमवार म्हंटला की गृहिणींना सुद्धा डब्बे बनवा, शाळा-कॉलेजची तयारी करून द्या, एक ना अनेक कामे असतात. आणि ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना तर अनेकदा आधी घरी सगळं काम करून मग पुन्हा वेळेत ऑफिसला जाण्याची सुद्धा जबाबदारी असते. थोडक्यात काय तर यावरून सोमवार हा दिवस अनेकांचा नावडता का आहे याचा अंदाज येऊ शकतो. अशाच एका सोमवार त्रस्त महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये या महिलेला तिच्या २ वर्षाच्या चिमुकल्या बाळाने ज्या पद्धतीने ऑफिसला जाण्यासाठी तयार केलं आहे ते पाहून नेटकरीही खुश झाले आहेत.

युवांश भारद्वाज याच्या पालकांनी त्याच्या नावाचं अकाउंट बनवून त्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओला अवघ्या काहीच दिवसात ७० लाखाहून अधिक व्ह्यूज व जवळपास तितक्यात लाईक्स व कमेंट्स आहेत. व्हिडिओमध्ये, लहान मुलगा आपल्या आईचे सांत्वन करताना दिसत आहे. त्याची आई मला ऑफिसला नाही जायचंय म्हणून चिडचिड करत असते ज्यावर हा लहान मुलगा म्हणतो “शांत हो, शांत हो ऑफिसला तर जायलाच लागतं ना” या बाळाचे बोबडे व गोंडस बोल ऐकून तुम्हालाही ऑफिसला जाण्याची प्रेरणा मिळू शकते.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Daughter Made Shirt For Dad
‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

आई व मुलाचा गोड Video

हे ही वाचा<< महिला व फ्रॉड माणसाचे चॅट्स झाले व्हायरल; गंडा घालणाऱ्याला शेवटी मिळाली नोकरीची ऑफर, झालं तरी काय?

अनेकदा लहान मुले शाळेत जायला कंटाळा करतात पण हा मुलगा पुढे जाऊन खूप समजूतदार होईल असे अंदाज या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओला एकदा पाहून मन भरतच नाही असेही काहींनी म्हंटले आहे. तुम्हाला आई व मुलाच्या गोड नात्याचा हा व्हिडीओ कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader