चिनी नौदलाच्या वाढत्या सागरी सामर्थ्यासोबत लढण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याने आपल्या विमानवाहू युद्धनौकेवरुन बॉम्ब हल्ल्याची चाचणी घेण्यात काही दिवसांपूर्वी घेतली होती.  अमेरिकेच्या नौदलाने समुद्रामध्ये केलेल्या या बॉम्ब हल्याच्या चाचणीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सुमारे १८ हजार किलोग्रॅमचा हा प्रचंड बॉम्ब समुद्रातील मध्यभागी विमानवाहू युद्धनौका गेरॉल्ड फोर्डवरुन समुद्राच्या मध्यभागी टाकण्यात आला. त्यामुळे समुद्रामध्ये मोठा स्फोट होऊन भूकंपसदृश परिस्थिती निर्माण झाली.

अमेरिकन नौदलाने त्यास फुल शिप शॉक ट्रायल म्हटले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या स्फोटामुळे समुद्राखाली ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. अमेरिकेच्या नौदलाने गेल्या शुक्रवारी ही चाचणी फ्लोरिडाच्या डेटोना बीचपासून १०० मैलांवर घेतली होती.

स्फोटाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

अमेरिकन नौदलाने बॉम्ब पाण्याखाली स्फोट केला असता त्यांचे विमानवाहक युद्धनौका पाण्याच्या पृष्ठभागावर वर होते. बॉम्ब  हल्ल्यांना घटनेत ही विमानवाहक युद्धनौका कोणत्या स्तरापर्यंत सहन करु शकते आणि युद्धादरम्यान ते किती प्रभावी ठरेल हे या चाचणीवरून दिसून आले. यूएसजीएसने या समुद्रातील भूकंपाची नोंद केली आहे. या मोठ्या स्फोटाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून आतापर्यंत ३० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या स्फोटानंतर अनेक चर्चा आता होऊ लागल्या आहेत. पण अमेरिकेच्या नौदलाचे म्हणणे आहे की तो पूर्णपणे सुरक्षित स्फोट होता. या स्फोटातून विमानवाहू युद्धनौकांच्या भविष्यातील युद्धाच्या शक्यतेची चाचणी घेण्यात आली. व्हिडिओमध्ये प्रस्तावित तीन स्फोटांचे वर्णन केले आहे. मात्र केवळ दोन चाचण्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  या स्फोटातून नौदलाने आपली तयारी दर्शविली आहे आणि त्याचबरोबर हे देखील दाखवून दिले आहे की आपण बॉम्ब हल्ल्यांचा सामनादेखील करू शकतो असे अमेरिकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या स्फोटाचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader