Railway accident video viral : रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई’, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक उत्तराखंडमधून धक्कादायक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. ३३ सेकंदाचा हा व्हिडिओ हृद्याचा ठोका चूकवणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वे सुरक्षा दलाच्या एका महिला कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावून एका व्यक्तीला ट्रेनच्या अपघातापासून वाचवलं आहे. एका व्यक्तीनं उत्तराखंड स्टेशनवर धावती एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याचा तोल गेला. त्यानंतर तो व्यक्ती एक्स्प्रेसच्या दिशेनं फरफटत गेला. त्याचदरम्यान ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसाने क्षणाचाही विलंब न लावता एक्स्प्रेच्या दिशेनं धाव घेऊन व्यक्तीचे प्राण वाचवले. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.आरपीएफ महिला जवान उमा यांनी तेव्हा तत्परता दाखवत त्या व्यक्तीला वाचवलं अन्यथा तो चाकाखाली जाण्याची शक्यता होती.

अवघ्या ३३ सेकंदात रेल्वेखाली गेला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर गाडी पुढे जाऊ लागली, यावेळी प्रवासी अजूनही फलाटावर असलेल्या स्टॉलवरच असल्याने ट्रेन पकडण्यासाठी धावण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, आधीच अन्न आणि इतर वस्तूंनी भरलेल्या हाताने ट्रेनचे हँडल पकडण्याची धडपड केल्याने त्याचा तोल गेला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडला. रेल्वेतील सहप्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबवून प्रवाशाला बाहेर काढले. सुदैवाने प्रवाशाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “म्हणून जास्त हवेत जायचं नाही” बिबट्याच्या नादाला लागणं मगरीला महागात पडला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्यक्तीला सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलीस आणि व्यक्तीच्या मदतीला शेजारी असलेले प्रवासी तत्काळ धाऊन आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हा व्हिडीओ comedyculture.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकरी रेल्वे सुरक्षा दलाच्या एका महिलेचं कौतक करत आहेत.