अंकिता देशकर
Vande Bharat Express Viral Video: इंडियन एक्सप्रेसला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक फोटो समोर आला. फोटोमध्ये लोको पायलट छत्री घेऊन रेल्वे चालवताना दिसत आहे. दाव्यानुसार हा फोटो केरळ मधील नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर डॉ. नम्रता दत्ता यांनी व्हायरल फोटो ट्विटरवर शेअर केला होता.
तपास:
इंडियन एक्स्प्रेसने व्हायरल इमेजवर रिव्हर्स इमेज सर्चसह तपास सुरू केला. पत्रकार आणि कार्यकर्त्या सुचेता दलाल यांच्या ट्विटर प्रोफाइलवर आम्हाला या घटनेचा व्हिडिओ सापडला. त्यांनी ९ ऑगस्ट २०१७ रोजी व्हिडिओ ट्वीट केला होता, ‘Railway safety?’ असे कॅप्शन दिले होते.
आम्हाला हाच फोटो इंडिया टाइम्सने अपलोड केलेल्या एका आर्टिकल मध्ये देखील दिसून आला. ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या एक रिपोर्ट मध्ये झारखंडमधील धनबादजवळ हा व्हिडिओ शूट केल्याचा दावा करण्यात आला आहे.हा व्हिडिओ आम्हाला Sangbad Pratidin या युट्युब चॅनेल वर देखील सापडला. हा व्हिडिओ एक बंगाली वृत्तपत्र प्रतिदिन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड.
ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर रेल्वे मंत्रालयानेही प्रतिक्रिया दिली होती.
एक्स्प्रेसचे छत गळत असल्याचे वृत्त खरे असले तरी या दाव्यासह प्रसारित केलेला वंदे भारतचा फोटो हा दिशाभूल करणारा आहे. २६ एप्रिल २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या टाइम्स नाऊ मधील अहवालात म्हटले आहे की, “वंदे भारत एक्स्प्रेसचे छत गळत असल्याची माहिती समोर आली. बुधवारी सकाळी रेल्वे अधिकार्यांनी याविषयी कारवाई केली. कासारगोड येथून दुपारी 2 नंतर ट्रेनने नियोजित प्रस्थान करण्यापूर्वी तंत्रज्ञांनी छत दुरुस्त केले.
हे ही वाचा<< “मुस्लिम मुलींना प्रेमाचं आमिष दाखवा, शरीरसंबंध… ” RSS चं हिंदू तरुणांना पत्र? व्हायरल पोस्टचं सत्य जाणून व्हाल थक्क
निष्कर्ष: रेल्वे इंजिनमध्ये छत्री घेऊन बसलेल्या लोको पायलटचा व्हायरल फोटो व्हिडीओ जुना आहे आणि नवीन केरळ वंदे भारत एक्सप्रेसच्या सध्याच्या समस्यांशी संबंधित नाही.