Viral Video : सध्या सगळीकडे दिवाळी उत्साहाने साजरी केली जात आहे. दिवाळी आली की घरोघरी पाहुणे येतात, घरोघरी फराळ बनवला जातो, फटाके उडवले जातात. सोशल मीडियावर दिवाळीचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका महिलेने केसात चक्क फटाके माळले आहे. तुम्ही आजवर गजरा फुल केसात माळताना पाहिले असेल पण हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. केसात चकरी, फुलझडी आणि अॅटम बॉम्ब माळलेला तुम्हाला व्हिडीओत दिसून येईल (video viral a woman wear the crackers in the hair by watching the video netizens reacted)

गजरा नव्हे तर केसात माळले फटाके

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला दिसेल. तिने केसामध्ये चक्क फटाके माळलेले आहे. या महिलेने जुडा घातला आहे आणि या केसाच्या जुड्याभोवती अॅटम बॉम्ब आणि चकरी माळलेली आहे आणि त्यावर फुलझडी लावल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हा व्हिडिओ बनवला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “बालपणीचे दिवस परत कधी येत नाही..” तुम्ही कधी ‘या’ बंदुकीच्या टिकल्या फोडल्या का? Video होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

suhani_makeup.studio या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिवाळीसाठी ब्रायडल पटाका बन”

हेही वाचा : “कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही

नेटकरी म्हणाले “आता हेच पाहायचे बाकी होते”

या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “फक्त एक आगपेटीची काडी हवी” तर एका युजरने लिहिलेय, “हा काय प्रकार” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक चूक महागात पडू शकते.” एक युजर लिहितो, “प्लीज सांभाळून..” तर एक युजर लिहितो, “आता हेच बाकी होतं पाहायचं” अनेक युजर्सनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

यापूर्वीही सोशल मीडियावर असे अनेक हटके व मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर नवनवीन गोष्टी शेअर करतात. पण काही गोष्टी इतक्या मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते.