साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो.जगात अनेक विषारी साप आहेत.ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं.तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पहिले असतील, तसेच अजगराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अजगर हा जगातील असा प्राणी आहे, जो स्वतःपेक्षा मोठ्या प्राण्यांनाही गिळू शकतो. जर कुणी अजगराच्या तावडीत सापडलं तर त्याची सूटका होणे सगळ्यात अवघड असतं. अशाच एका महाकाय अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा महाकाय अजहार पाहून तुमचाही थरकाप उडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशमध्ये आढळला महाकाय अजगर –

उत्तर प्रदेशमधील गडमुक्तेश्वर परिसरातील चितोर्डा जंगलातील हा व्हिडीओ असून दुपारच्या कडक उनात हा अजगर बाहेर आला आहे. हा एवढा महाकाय अजगर पाहून कुणालाही धडकी भरेल. काळ्या रंगाचा भला मोठा, लांबच्या लांब त्याचा आकार आहे. हा महाकाय अजगर काही गावकऱ्यांना दिसल त्यानंतर गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली आणि अजगराला पकडून नेण्यात आले. गढमुक्तेश्वरच्या जंगलात महाकाय अजगर दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. गतवर्षी सिंभोली येथील रहिवासी परिसरात एकामागून एक सहा अजगर दिसले होते. आता पुन्हा एकदा महाकाय अजगर बघून गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. अनेकवेळा हापूरच्या गावांमध्ये अजगरही आढळून आले आहेत. वनविभागाचे पथक त्यांना पकडून जंगलात सोडत आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Viral video: ‘नवरा माझ्यासाठी गाणं गात नाही’, तक्रार घेऊन पत्नी थेट पोलिसांत

हा जगातील सर्वात लांब साप आहे आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक आहे.  संपूर्ण व्हिडीओ पाहताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की…

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral big python seen in uttar pradesh forest srk
Show comments