रील्ससाठी काही करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. भररस्त्यात, रेल्वे स्टेशनवर, रेल्वेमध्ये, मेट्रोमध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी डान्स करत रिल बनवणाऱ्यांचे कित्येक व्हिडिओ रोज पाहायला मिळतात. पण एका कॉन्स्टेबलच्या बायकोला भररस्त्यात रील शुट करणे महागात पडले आहे.

अलिकडेच एका रील क्रेझच्या घटनेत, चंदीगडमध्ये भररस्त्यात उभे राहून एक महिला डान्स करत आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. झेब्रा क्रॉसिंगजवळ ही महिला तिचा डान्सचा व्हिडिओ शूट करत आहे. तिच्या मागे वाहनांच्या रांगा लागल्याने आहे तरी तिला त्याची काहीही पर्वा नाही. हरियाणवी गाण्यावर ती नाचताना दिसत आहे. ज्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

२० मार्च रोजी, चंदीगडमधील सेक्टर २० च्या रस्त्यावर ही घटना घडली. तिची ओळख ज्योती म्हणून असून ती एका पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी असल्याचे समोर आले.

पाहा Viral Video

ज्योती ही स्थानिक रहिवासी होती जी जवळच्या हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी तिच्या घराबाहेर पडली होती. पण, तिने तिची वहिनी पूजाबरोबर गर्दीच्या रस्त्यावर एक रील तयार करण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या मधोमध तिच्या नृत्य सादरीकरणामुळे वाहतूक कोंडी झाली आणि ती रस्त्याच्या कडेला येईपर्यंत वाहनांना थांबावे लागले.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिग्नल हिरवा असल्याचे दिसून आले, परंतु ती रस्त्यावर नाचत असताना वाहने झेब्रा लाईनच्या मागे उभी होती. चमकदार पिवळा भारतीय पोशाख आणि दुपट्टा घालून तिने ‘सासू तेरा लाडला मने पिके लव्ह यू बोले से’ गाण्यावर नाचत आहे. ती नाचत फिरत असताना, वाहने थांबून ठेवावी लागली.

पोलिसांची कारवाई

पोलिस पत्नीच्या कृत्याचे कायदेशीर परिणाम भोगावे लागले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हेड कॉन्स्टेबल जसबीर यांनी ज्योतीच्या नृत्य सादरीकरणाविरुद्ध तक्रार दाखल केली. चंदीगड पोलिसांनी ज्योती आणि तिची मेहुणी पूजा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पती निलंबित

ज्योतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ऑनलाइन रील अपलोड केल्यामुळे तिच्या पतीवरही कायदेशीर कारवाई झाली. या पोलिसाचे नाव अजय कुंडू असे आहे, जो सेक्टर १९ पोलिस ठाण्यात तैनात होता. पत्नीच्या कृत्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले.