सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. यामध्ये प्राण्यांचेही काही व्हिडीओ असतात.प्राण्यांमधील मारामारी तर कधी त्यांच्यातील प्रेम असे व्हिडीओ आपण पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही लोकांना सरप्राईजही देतात. चिंपांझी हा सर्वात बुद्धीमान प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या प्राण्याच्या कित्येक सवयी हुबेहुब माणसांसारख्याच असतात. अशातच एका प्राणीसंग्रहालयातील एका चिपांझी माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे पाहून तुम्हीही म्हणाल आई ही आईच असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंपांझीसमोर सिंहाच्या पिल्लांना सोडलं

नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी सिंहाच्या पिल्लांसह मजा करताना आणि आईप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या चिंपांझीचे नाव लिंबानी असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, चिंपांझी त्या सिंहाच्या पिल्लांशी अगदी तसाच खेळतात जसे की एखादा माणूस मांजरीच्या पिल्लांशी खेळत असतो. तसेच चिंपांझी त्या पिल्लांना मिठी मारताना आणि प्रेम करताना दिसत आहेत. ही सिंहाची पिल्ले अगदी मांजरीसारखी दिसत आहेत. हा चिंपांझी सिंहाच्या पिल्लांना अगदी आईसारखी माया करत आहे.

हेही वाचा – Video: पठ्ठ्यानं सुरु केली थेट ऑडीतून चहाची विक्री; मार्केटींगचा नवा फंडा व्हायरल

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: विजेच्या वेगानं चालतोय ‘या’ महिलेचा हात; टायपिंग स्पीड पाहून व्हाल थक्क

खरं तर सिंहांना जंगलाचा राजा म्हटले जातं. सिंह लहान असला तरी, त्यांच्या भीतीने संपूर्ण जंगल हादरतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मात्र वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस उतरला असून व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. तर 4 लाख 87 हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral chimpanzee meeting tiny lion for first time srk