सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात. सध्याच्या काळात तरूणाई वेगवेगळे स्टंट करताना दिसते.तसंच आपण अनेक चित्रपटांमध्येही हिरोंना स्टंट करताना पाहतो. पण काहीवेळा हेच स्टंट त्या स्टंटमॅनच्या जिवावरही बेतताना दिसतात. अनेक हिरोंनासुद्धा स्टंट करताना आपण जखमी झाल्याचं पाहिलं असेल.अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू –

चीनमध्ये स्वटेजर लाईव्ह परफॉर्म करत असतानाच उंचावरुन खाली पडून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही महिला मंचावर आपल्या पतीसह परफॉर्म करत होती. यावेळी तब्बल ४५ ते ५० फुटांवरुन महिला खाली पडली आणि ठार झाली. मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात लाईव्ह कैद झाला आहे. ट्विटरला अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. अनहुई प्रांतात ही घटना घडली आहे. सन मौमौ असं या महिलेचं नाव असून ती तिच्या पतीसोबत होउगाओ गावात परफॉर्मन्स करत होती.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – video viral: आयुष्यभर असाच पालकांचा आधार हो; या चिमुकल्यानं जिंकली नेटकऱ्यांची मनं

या प्रकरणाबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते दोघे कोणत्याही सुरक्षेशिवाय अ‍ॅक्शन सीन करत होते. तसंच याआधीही तसंच उपस्थितांवर आपली छाप पाडण्याच्या हेतूने ते अनेकदा सेफ्टी बेल्टशिवाय स्टंट करायचे, या दोघांच्या सुरक्षेबाबत वाद झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.