आपल्या देशात क्रिकेटचे अधिक दिवाने आहेत. ज्यावेळी क्रिकेटची मॅच सुरु असते. त्यावेळी भारतातील रस्ते सुद्धा मोकळे दिसतात. क्रिकेटला एखाद्या धर्माप्रमाणे मानलं जात आहे. क्रिकेट हा भारतीयांच्या सर्वात जवळचा विषय आहे. इथे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच क्रिकेटचं वेड आहे. भारतात गल्ली-गल्लीत तुम्हाला लोक क्रिकेट खेळताना दिसतील. पण तसे पाहाता क्रिकेट हा काही भारताचा नॅशनल खेळ नाही. ब्रिटीश हा खेळ भारतात घेऊन आले. पण आता हा खेळ भारतीयांच्या जवळचा झाला आहे. काही लोक क्रिकेटसाठी इतके वेडे असतात की, चान्स मिळेल तिथे ते क्रिकेट खेळतात. आतापर्यंत तुम्ही मैदानात, रस्त्यावर, गल्लीत क्रिकेट खेळलं असेल किंवा पाहिलं असेल, मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तरुण चक्क समुद्राच्या मधोमध क्रिकेट खेळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समुद्राच्या मधोमध खेळतायेत क्रिकेट

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोठ्या जहाजावर काही लोक क्रिकेट खेळत आहे आणि हे जहाज समुद्रावर तरंगताना दिसत आहे. बॉल पाण्यात गेल्यावर हरवू नये यासाठीही त्यांनी जुगाड केल्याचं दिसत आहे.चेंडूला इतक्या बारीक पण मजबूत धाग्यात बांधले आहे की, चेंडू पाण्यात गेला तर धाग्याच्या साहाय्याने तो परत जहाजात खेचला जात आहे. अशा प्रकारे ते क्रिकेट खेळत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: कार ट्रकखाली घुसली, पार चेंदामेंदा झाला…मात्र पुढच्याच क्षणाला ड्रायव्हर सहिसलामत बाहेर

यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळण्यासाठी काय काय करु शकतात हे यातून दिसत आहे.