उत्तर दिल्ली जिल्हा आणि सदर पोलिस ठाण्याच्या विशेष कर्मचाऱ्यांनी खुजली गँगच्या दोघांना अटक केली आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. खुजली गँगचे लोक गुपूचूप एखाद्याच्या अंगावर खाज सुटणारी पावडर टाकत असते. अचानक खाज होऊ लागल्याने व्यक्तीचे दुर्लक्ष्य होऊन हे आरोपी लक्ष वळवून घेत लोकांची लुटत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

सदर भागातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी स्वत:हून दखल घेतली आणि आरोपींपर्यंत पोहोचले, अद्यापपर्यंत या प्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. सध्या पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत.

Instantly make tasty rice vada
तिखट, झणझणीत खावंसं वाटतंय? झटपट बनवा तांदळाचे चविष्ट वडे; नोट करा साहित्य आणि कृती
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
common causes of feeling bloated
Bloating And Gas : सतत पोट फुगल्यासारखं वाटतं का? मग वाचा ही यादी अन् आजच करा तुमच्या सवयीत बदल; जाणून घ्या डॉक्टरांचे मत…
Loksatta lokrang article about Painting Ganpati 2024
चित्रास कारण की…: गोलम् स्थूलम् सुंदरम्
Two youths were washed away in the sea water
‘स्वतःच्या जीवाशी खेळ…’ सुमद्राच्या पाण्यात मजामस्ती करणं आलं अंगलट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यमदेव तुम्हाला…”
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
tasty wheat flour modak
Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!

जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जात असाल आणि अचानक तुमच्या शरीराला खाज सुटू लागली तर तुम्हीही सतर्क राहायला हवे. खुजली गँगच्या लुटीला बळी पडू नका. गजबजलेल्या भागात असे प्रकार सध्या घडत आहेत. अशाच घटनेचे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही आरोपी एका व्यक्तीच्या अंगावर गुपचूप खुजली पावडर टाकताना दिसत आहेत. पावडर टाकताच त्या व्यक्तीच्या अंगात अचानक खाज सुटू लागते म्हणजेच त्याचे लक्ष जवळच्या वस्तूवरून दुसरीकडे जाते. याचा फायदा घेत आरोपीने लोकांच्या नकळत बॅग गायब करून पळून जातात.

दिल्ली पोलिसांकडे कोणतीही तक्रार आली नाही

हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांपर्यंतही पोहोचला, मात्र अद्याप याप्रकरणी पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. असे असतानाही पोलिसांनी स्वत:हून दखल घेत या प्रकरणात कारवाई करून मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी व्हायरल फुटेजच्या आधारे कारवाई करत आरोपींची ओळख पटवली आणि अखेर चौकशी करत असताना पोलीस हा गुन्हा करणाऱ्या आरोपीपर्यंत पोहोचले.

हेही वाचा – Video : निर्दयीपणाचा कळस! लेकरू पाणी मागत राहिलं अन् आईची अंगावर बसून अमानुष मारहाण, बुके मारले, चावली अन् जमिनीवर आपटलं डोकं

हेही वाचा –देवासारखी धावून आली महिला डॉक्टर! दिल्ली विमानतळावर अचानक वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका; वेळीच CPR देऊन वाचवला जीव, Video Viral

दोन्ही आरोपी बंगालचे रहिवासी आहेत
मुन्ना आणि राजेंद्र अशी या आरोपींची ओळख पटली असून, हे दोघेही पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीचे रहिवासी असून त्यांनी यापूर्वीही पश्चिम बंगालमध्ये अनेक गुन्हे केले होते, मात्र दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी असे गुन्हे करण्यास सुरुवात केली दोघांनाही पोलिसांनी पकडले. याप्रकरणी अद्याप पोलिसांपर्यंत कोणतीही तक्रार पोहोचलेली नाही, ज्या व्यक्तीबरोबर हा प्रकार घडला आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, जेणेकरून पोलिस पुढील कारवाई करू शकतील.