सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं आहे. मायानगरी मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी किंवा याच ट्राफिमध्ये फसू नये म्हणून डोंबिवलीकरांनी असं डोक चावलंय की पाहून तुम्हीही म्हणाल मानलं पाहिजे बुवा. डोंबिवलीकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

डोंबिवलीकरांचा ट्राफिकवर देसी जुगाड

या व्हिडीमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला मोठेच्या मोठे रिकामे पाईप पडलेले आहेत. या पाईमुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होत आहे, तसेच त्यामुळे रस्त्यावर ट्राफिकही जाम झाले आहे. मात्र यातूनही डोंबिवलीकरांनी भन्नाट डोकं चालवलंय. डोंबिवलीकरांनी चक्क या रिकाम्या पाईपमधून रस्ता काढलेला पाहायला मिळतोय. या बाईकस्वारांनी चक्क रिकाम्या पाईपच्या आतून आपल्या गाड्या न्हेत रस्ता काढलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video viral: देव तारी त्याला कोण मारी! ३० फूट उंचावरुन पडली चिमुकली अन्…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरीही यावर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. मुंबई-पुण्याचे अंतर अवघ्या काही तासांत पार करण्यासाठी केंद्र सरकारने हायपरलूप प्रकल्प जाहीर केला होता. या प्रकल्पाची संपूर्ण देशभर चर्चा झाली होती, हा प्रकल्प कधी होईल ते माहिती नाही मात्र डोंबिवलीकरांनी हा प्रकल्प येण्याआधीच हायपरलूप ट्रेनचा आनंद घेतला आहेअशा मजेदार प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Story img Loader