Viral video: सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला टेक्ट, फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला हसाव की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओमधील व्यक्ती ही दारुडी आहे जी दारु पिऊन काय करतेय हे तिलाच कळत नाही.
दारु माणसाला काहीही करण्यासाठी भाग पाडू शकते. याच्या अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल. तसेच तुम्ही काही लोकांना असं करता पाहिलं असेल. नेहमी शांत असलेली व्यक्ती अचानक दारु प्यायल्यानंतर वाघ बनते आणि आकाशातील चंद्र तारे तोडून आणण्याच्या बाता मारते. मात्र मुळात त्यांना यावेळी कशाचेच भान नसते. त्यांना स्वत:लाही धड सावरता येत नाही. असाच एक व्यक्ती दारूच्या नशेत थेट मोबाईलच्या टॉवरवर जाऊन झोपला. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही घटना भोपाळच्या बारखेडी भागात घडली असून हा तरुण एवढ्या उंच टॉवरवर चढल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला.
सुदैवाने, त्या व्यक्तीला कोणतीही दुखापत झाली नाही आणि पोलिसांनी वेळीच त्याची सुटका केली. मात्र, सध्या तो तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. तपासाच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करतील.मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या ऐशबाग भागात राहणारा ३३ वर्षीय विवेक ठाकूर असे तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत मोबाईल टॉवरवर चढू लागला. तो एक महत्त्वाची उंची गाठण्यासाठी सुमारे २० मिनिटे तीच चढाई करत राहिला आणि त्याला झटकण्याचा प्रयत्न करत राहिला. त्याला चढताना पाहून टॉवरभोवती मोठा जमाव जमला.
पाहा व्हिडीओ
तरुण पोलिसांच्या ताब्यात
लोकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस आणि महापालिकेला माहिती दिली. काही वेळाने महापालिका, पोलिस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. जहांगीराबाद पोलिस स्टेशनचे एएसआय राजेंद्र यादव यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून प्रकरण आटोक्यात घेतले. पोलिस आणि बचाव पथकाने तरुणाशी संवाद साधला आणि दुपारी २.४० च्या सुमारास त्याला सुखरूप खाली आणले. सध्या पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.