Video Viral, Auto driver speaking in English: गेल्या अनेक काळापासून इंग्रजी भाषेचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आधी फक्त आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या पालकांची मुलं इंग्रजी शाळेत जात असत. पण, गरिबांनादेखील वाटतं आपलं मूल इंग्रजी शाळेत शिकावं, त्याने फाडफाड इंग्रजीत बोलावं. श्रीमंतांच्या घरी हे सहज सोप्प असतं, पण गरीब माय-बापाला आपल्या लेकाला इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी अगदी जीवाचं रान करून शाळेची फी भरावी लागते.

गरीब परिस्थितीमुळे आपल्याला शिक्षण मिळालं नाही म्हणून आपल्या मुलाने चांगलं शिकावं, एकापेक्षा अधिक भाषा बोलाव्यात ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण जेवढं इंग्रजी, इतर भाषा किंवा शिक्षण मुलांना गरजेचं आहे, तेवढंच ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गरजेचं आहे आणि हे म्हणणं एका वयोवृद्ध रिक्षाचालकाचं आहे.

Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा… Viral Liquor Shop Poster: अरेच्चा! दारूच्या दुकानात शिकवलं जाणार इंग्रजी? ‘हे’ VIRAL पोस्टर पाहून चक्रावून जाल

हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपण अगदी अचंबित होतो. असाच एका वयोवृद्ध रिक्षाचालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या वृद्धाला पाहून वाटणारही नाही, एवढं अस्खलित इंग्रजी तो बोलताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

व्हायरल झालेल्या या (Video Viral) व्हिडीओत आपण पाहू शकता की, भूषण पोहाणे नावाचा एक गृहस्थ या वयोवृद्ध रिक्षाचालकाचा व्हिडीओ काढत आहे. या रिक्षाचालकाच्या रिक्षात एक प्रवासी बसला असल्यामुळे वयोवृद्ध गृहस्थाला सांगतात की, त्यांच्याकडे वेळ नाही, कारण मी इथे व्हिडीओसाठी थांबलो तर माझ्या प्रवाशाला उशीर होईल, तेव्हा मला या व्हिडीओसाठी बोलता येणार नाही. पण, भूषण प्रवाशाला विनंती करतो आणि अगदी थोडासा वेळ दोघांचा मागतो. यावर दोघंही मंजुरी देताच रिक्षाचालक अगदी स्पष्ट आणि शुद्ध इंग्रजीत बोलायला लागतो.

रिक्षाचालक त्याला म्हणतो की, “जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही लंडन, पॅरिस, यूके अशा ठिकाणी सहज जाऊ शकता. जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. उदा. जर तुम्ही लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये असाल आणि तुम्ही त्यांच्याकडे इंग्रजीतून संवाद साधला तर त्यांना तुमचं म्हणणं कळेल, पण जर तुम्ही त्यांच्याशी मराठीत बोललात की, मला एक ग्लास पाणी दे तर ते तुम्हाला तिथून हकलून देतील. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला इंग्रजी बोलता आलं पाहिजे, समजलं पाहिजे; कारण ही एक आंतरराष्ट्रीय भाषा झालेली आहे.”

हेही वाचा… शर्ट, लुंगी अन्…, शेतकरी तरुणीने भातशेती करता करता ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर केला भन्नाट डान्स; VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ ‘bhushan_pohane’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आज मी एका गृहस्थाला भेटलो, जो एक रिक्षाचालक आहे. आमच्यात खूप मजेदार संभाषण झाले, परंतु माझ्यासाठी हे खूप आश्चर्यकारक होते की तो इंग्रजीमध्ये खूप अस्खलित संवाद साधत होता आणि लोकांना वेगवेगळ्या भाषा शिकण्याचा आग्रह करत होता”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

हा व्हिडीओ व्हायरल होताच एका युजरने कमेंट करत लिहिलं, “चाचाने दिल जीत लिया”, तर एकाने त्यांना भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची उपमा दिली.

Story img Loader