माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. काही हौशी लोक प्राण्यांसाठी कितीही तडजोडी करायला तयार असतात. वेळात वेळ काढून जमेल तसं ते प्राण्यांची काळजी घेतातच. त्यामुळे या प्राण्यांचं खाणं, पिणं, झोपणं, फिरणं हे सुद्धा त्या मालकाबरोबरच असतं. दरम्यान लोक सहसा कुत्रे आणि मांजर यांसारखे पाळीव , बाईकवर कार घेऊन जाताना दिसतात. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल, कारण एका महिलेनं चक्क गाईच्या वासरला कारमध्ये बसवलं आहे.
कारमध्ये बसलं गायीचं वासरू
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कार चालवत असताना एका महिलेनं तिच्या बाजूच्या सीटवर चक्क गायीच्या वासरला बसवलं आहे. एवढचं नाही तर, या वासराला सीट बेल्टही लावला आहे. हे वासरुही अगदी शांतपणे सीटवर बसलेलं आहे. रस्त्यावरील आजूबाजूचे लोकही या वासराला कारमध्ये बघून शॉक झाले आहेत. पांढरं शुभ्र वासरु या व्हिडीओमध्ये अतिशय गोंडस दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ –
हा व्हिडीओ @Patekar_in या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांच्याही हा व्हिडीओ चांगलाच पंसतीस उतरला आहे. या गोड वासराला पाहून तुम्हालाही समाधान वाटेल. हे वासरू गाडीमध्ये शांतपणे बसेललं आपल्याला दिसत आहे.