Viral video: सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचं एक गाण म्हणजे, ”पाव्हणं जेवला काय?”. या गाण्याचे बोल ऐकून तुमच्या डोळ्यासमोर गौतमी पाटील नक्कीच आली असेल. या गाण्यावरील तिच्या अदा आणि नृत्याने अनेकांना वेडं लावलयं. पण सध्या हे गाणं गौतमी पाटीलमुळे नव्हे तर काही आज्जीबाईंमुळे चर्चेत आलं आहे.

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात, त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण, सध्या सोशल मीडियावर दोन आजीबाई व्हायरल होत आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतो’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो, कारण व्हिडीओमध्ये आजी ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर खाली पडू न देता या आजीबाईंनी नृत्य केलंय.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
Viral video of two little girls getting fighting is going viral on social Media after shankarpalya funny video
आता गं बया! बोबड्या बोलात चिमुकलींचा एकमेकींसोबत जोरदार राडा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल मंडळी
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये या ५,६ आजीबाई गर्दीच्या मधोमध येऊन मनसोक्त नाचताना दिसत आहेत. यावेळी पाव्हणं जेवला का हे गाणं लागलेलं असून आजीबाईंनी या गाण्यावर चांगलाच ठेका धरला आहे. विशेष म्हणजे एवढं मनसोक्त नाचतानाही एकीच्याही डोक्यावरुन साडीचा पदर काही खाली आलेला नाही. या आजीबाईंचा उत्साह पाहून इतर तरुण महिलावर्गही अवाक् झाला आहे. सर्व महिला पुरुष टाळ्या वाजवत या आजीबाईंना प्रोत्साहन देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर lavanipremi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजींच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हटलंय, “डान्स केला आजींनी, पण पदर खाली पडू नाही दिला. यालाच तर म्हणतात संस्कार”, तर आणखी एकानं “अशी पिढी पुन्हा होणे नाही..छान मनातलं दुःख विसरून जीवनाचा आनंद घेतला” “आमची खान्देशी माया पण अशाच आहे शेवटचे जनरेशन आहे हे आता” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader