Video Viral Influencer Kissing Chained Tiger : पाकिस्तानमध्ये, बिबट्या आणि वाघांसह विदेशी प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणून पाळण्याचा ट्रेंड वाढत आहे. पाकिस्तानच्या वन्यजीव संरक्षण कायद्याने विदेशी प्राण्यांच्या खाजगी मालकीवर बंदी घातली असली तरी, अंमलबजावणी अजूनही शिथिल आहे, ज्यामुळे बेकायदेशीर व्यापार वाढू लागला आहे. आता, विदेशी प्राण्यांचे धक्कादायक व्हिडिओ दाखवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानी कंटेंट क्रिएटरने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या त्याच्या नव्या व्हिडीओमुळे तो चर्चेत आला आहे. व्हिडिओमध्ये, लाहोर येथील नौमान हसन याने साखळदंडाने बांधलेल्या वाघाला किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हसनने केलेल्या स्टंटमुळे नेटकऱ्यांनी टिका केली आहे. अनेकांनी ते वर्तन असुरक्षित, धोकादायक, अनैतिक आणि पूर्णपणे त्रासदायक म्हटले आहे.

वाघाला साखळीने बांधून केले किस

व्हिडीओमध्ये पाहू शकता की गवतावर एक वाघ बसलेला आहे ज्याला साखळदंडाने बांधलेले आहे. एक व्यक्ती त्याच्या अगदी तोंडासमोर बसलेली आहे. तो वाघाला बिनधास्तपणे वाघाच्या डोक्यावरून हात फिरतो आहे. वाघाच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न देखील करतो. वाघाच्या डोक्याला हात लावताना अचानक वाघ त्याचा हात तोंडात देखील पकडतो पण व्यक्तीने इशारा करताच तो हात सोडून देतो. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसलेला आहे.

व्हिडिओ पहा:

व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून त्याला २,३०,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये, काही वापरकर्त्यांनी श्री. हसन यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक केले, तर बहुतेक प्रेक्षक त्यांनी जे पाहिले ते पाहून घाबरले.

“हे धोकादायक आहे,” एका वापरकर्त्याने लिहिले. “ही क्लिप पाहून मला भीती वाटली,” दुसऱ्याने कमेंट केली.

“वन्य प्राण्यांचा आदर केला पाहिजे,” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले. “वाघ पाळीव प्राणी नाही,” एका वापरकर्त्याने कमेंट केली.

वन्या प्राण्यांनबरोबर आधीही पोस्ट केले व्हिडीओ

दरम्यान, हाच कंटेंट क्रिएटर आधी एका मोठ्या वाघावर स्वार होताना दिसला होता. व्हिडिओमध्ये तो बेफिकीरपणे त्या मोठ्या वाघाच्या पाठीवर बसून त्याला एका मोकळ्या जागेतून मार्ग दाखवत होता. पार्श्वभूमीत दोन पिंजरे देखील दाखवले गेले होते, एक सिंहाला बंदिस्त करून आणि दुसऱ्यामध्ये एका मादी सिंह बंद असल्याचे दिसते. या व्हिडीओमुळे प्राण्यांच्या राहणीमानाबद्दल अतिरिक्त चिंता निर्माण झाली होती.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये, श्री हसन शांतपणे सोफ्यावर त्याच्या शेजारी बसलेल्या चित्त्याशेजारी बसेलेला दिसत आहे. पण, प्राण्याने लगेच प्रतिक्रिया दिली, त्याला ओरबाडले आणि कंटेंट क्रिएटरला उडी मारून दूर जाण्यास भाग पाडले. या व्हिडिओवर ऑनलाइन मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, अनेक वापरकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की अशा प्राण्यांना कंटेंटसाठी घरगुती जागांमध्ये का ठेवले जात आहे.

अंदाजानुसार पाकिस्तानमध्ये १०० हून अधिक वाघ पाळीव प्राणी म्हणून ठेवले जातात, त्यापैकी बरेच शेजारील देशांमधून तस्करी करून आणले जातात किंवा बंदिवासात प्रजनन केले जातात. या बंदिवान वाघांना अनेकदा अमानुष परिस्थिती, अपुरी काळजी आणि राहणीमानाच्या वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या जीवासाठी मोठे धोके निर्माण होतात.