Viral video: देशभरात सध्या प्रचंड थंडी पडली आहे. काही ठिकाणी तर तापमान शून्याच्याही खाली गेलय. गावाकडे भर दुपारी रस्त्यावर धुकं पडलेलं दिसतेय. पण भारत हा जुगाडू लोकांचा देश आहे. अन् इथले लोक प्रत्येक समस्येवर तोडगा शोधून काढतात. अन् असाच काहीसा तोडगा एका तरुणानं शोधून काढलाय. त्यानं भर थंडीत थंडी वाजू नये म्हून काय जुगाड केलाय पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून खरंच तुम्हीही अवाक् व्हाल. कारण हा तरुण थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क जळत्या लाकडावर जाऊन झोपलाय. हो हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगभरात एकापेक्षा एक जुगाडू लोकं आहेत. हे लोक असे असे जुगाड करून दाखवतात की त्यांच्यापुढे मोठमोठे शास्त्रज्ञ सुद्धा फेल होतील. असाच एक अतरंगी जुगाड समोर आला आहे. हा जुगाड पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल. कारण एका व्यक्तीनं कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी चक्क भट्टीवरच झोपलाय.. विश्वास बसत नाहीये तर मग व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वाढत्या थंडीच्या प्रभावामुळे एक व्यक्ती चक्क जळत्या लाकडावर जाऊन झोपला आहे. हे दृश्य फार थरारक आणि भीतीदायक आहे. मुख्य म्हणजे, यावेळी हा व्यक्ती एकदम निवांत होऊन या जळत्या लाकडावर बसल्याचे दिसून येत आहे. पण हीटर लावणेही एका व्यक्तीसाठी पुरेसे नव्हते, म्हणून त्याने काही लाकूड पेटवले आणि त्यावर झोपले. पुढे आगीच्या या ज्वलंत प्रकाशात आपल्या जीवाची पर्वा न करता हा व्यक्ती कसाकाय इथे झोपू शकतो असा प्रश्न सर्वांना पडला. धोक्याशी खेळत तो त्या ज्वलंत आगीच्या लाकडांवर आरामात पडून असतो. ज्वाळा थोड्याशा तेजस्वी झाल्या की, माणूस घाबरतो आणि जळत्या लाकडापासून उठून दूर होतो. या व्यक्तीचा सर्दीपासून सुटका करण्याचा मार्ग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>ओ काका जरा दमानं! उलटे उभे राहून बाईक चालवायला गेले अन्… विचित्र स्टंटबाजीचा VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर altu.faltu नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हंटलंय “हे फक्त भारतात होऊ शकतं” तर आणखी एकानं “अरे मस्करीची कुस्करी होईल उठं” अशी प्रतिक्रिया दिली आहे. असो, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही अशा भट्टीवजा बेडवर झोपणं पसंत कराला का? आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral it was so cold that the person lay down on the burning woods watch this viral video netizans shock srk