प्राण्यांच्या दहशतीचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ कधी खूपच मनमोहक असतात, तर काही व्हिडीओ हे थरारक शिकारीचे असतात. गेल्या काही वर्षांमध्ये जंगल परिसरात पर्यटनांमुळे आपला वावर वाढल्यानंतर वन्यप्राणी अनेक वेळा रस्त्यावर येताना दिसतं आहे. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून हा बिबट्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. हा बिबट्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सुरुवातीला भयानक वाटणाऱ्या व्हिडीओनं नंतर वेगळंच वळण घेतलं.
अन् बिबट्याने त्या व्यक्तीला मिठी मारली –
आपण अनेक वेळा पाहिलं असेल कधी कधी भयानक दिसणारे प्राणीसुद्धा माणसांना आपलंस करतात. अशाच एका शक्तीशाली प्राण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक डोंगराळ भागातून रस्त्यावरुन जात असताना तिथे अचानक एक बिबट्याचं पिल्लू येतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ते लहानसं पिल्लू कदाचित जंगलातून भटकलं असावं. विशेष म्हणजे हे बिबट्याचं पिल्लू माणसांवर हल्ला करत नाही. तर तो त्यांचासोबत खेळू लागतो. एवढंच नाही तर तो एका व्यक्तीला मिठी मारतो. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral Video : चक्क पिस्तूलानं कापला केक, काही क्षणातच तरुणाची हिरोगिरी अंगलट
व्हिडिओमध्ये बिबट्या एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा मिठी मारताना दिसत आहे. या दरम्यान ती व्यक्ती देखील घाबरण्याऐवजी शांत राहते. त्यानंतर तो बिबट्या तिथून निघून जातो. या व्हिडीओला आतापर्यंत 4 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूज तर 19 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् होतं आहेत.