leopard viral video: जंगलातील सर्वात भयानक आणि धोकादायक प्राण्यांच्या हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असलेलेल पहायला मिळतात. अंगावर काटा आणणारे अनेक शिकारीचे व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असतात. कोण कधी अचानक कोणावर हल्ला करेल याचा काही नेम नसतो. नुसतं बिबट्याचं नाव जरी घेतलं तरी अंगावर येतो. अशातच बिबट्याचा हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिबट्याची चपळाई –

चपळाई आणि हल्ल्याचं तंत्र या बाबतीत वाघालाही मात देईल असा प्राणी म्हणजे बिबट्या. बिबट्याचा तुफान वेग आणि विलक्षण चपळाई भल्याभल्या शक्तिशाली प्राण्यांनाही हार पत्करायला लावू शकते. त्यामुळे बिबट्यानं शिकारीसाठी चाल केली, की समोरच्या प्राण्याचा खेळ खलास झालाच म्हणून समजयाचं! पण रणथंबोरच्या जंगलात जे घडलंय, ते पाहून कुणाचेही डोळे चक्रावतील. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या झाडावर बसलेल्या माकडांची शिकार करण्यासाठी चक्क झाडावर चढतो. बिबट्या आपल्या भक्ष्याचा, माकडाचा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पाठलाग करताना दिसत आहे. त्यानंतर बिबट्या माकडाची शिकार करण्यासाठी एक चित्तथरारक झेप घेतो मात्र अपयशी ठरतो. बिबट्या झाडावरुन थेट खाली कोसळतो. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – सेक्स करताना मादी कोळी करते मृत असल्याचं नाटक; कारण एकून अवाक् व्हाल

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून त्याला ५५ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.