Viral Video: सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशाच एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र नशिब बलवत्तर म्हणून ही चिमुकली बचावली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाचा ठोका नक्कीच चुकेल.

देव तारी त्याला कोण मारी!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला घरात एकटा असताना घराच्या बाल्कनीत खेळताना अचानक तोल जाऊन खाली पडतो, मात्र हा चिमुकला वरुन पडून चौथ्या मजल्यावर अडकतो. यादरम्यान त्याला चौथ्या मजल्यावर लटकलेलं पाहून लोक ओरडायला लागतात. त्यानंतर बरेच लोक त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि अयशस्वी होतात. दरम्यान एक धाडसी व्यक्ती चपळाई दाखवत इमारतीच्या बाल्कनीतील लोखंडी ग्रीलला धरून मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतर अखेर हा व्यक्ती त्या बाळाजवळ पोहचतो आणि त्याला वाचवतो. त्याला पकडून घरात घेऊन जातो.या व्यक्तीच्या धाडसाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.

Disgusting Video viral
व्हायरल होण्यासाठी तरुणाने ओलांडली मर्यादा! टॉयलेट सीटजवळ बसून केलं किळसवाणं कृत्य; पाहा VIDEO
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
shocking video
Video : “जीव एवढा स्वस्त असतो का?” रिल बनवण्यासाठी तरुणीने केला उंच झाडाच्या शेंड्यावर चढून डान्स, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: हत्तीनं तरुणीला सोंडेनं उडवलं, शेवट पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल

@OnlyBangersEth नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.  व्हिडिओ सोशल मीडियावर वापरकर्त्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत.

Story img Loader