रस्त्यावरून चालताना निष्काळजीपणामुळे अपघात होताना आपण अनेकदा पाहतो. त्याचबरोबर अपघाताचे असे अनेक व्हिडिओ सध्या पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये कधी चालकाच्या चुकीमुळे अपघात होतात तर कधी रस्त्यावर चालणाऱ्याच्या. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पावसात कारच्या बोनेटवर पडलेली दिसत आहे. त्याचवेळी कारचालक आपले वाहन वेगाने चालवताना दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर आतापर्यंत ट्रॅफिक पोलिसांना अनेकांनी फरकटत नेल्याच्या अनेक घटना घडल्याचे आपण पाहिलंय. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ चीनचा असल्याचा सांगितला जात आहे. व्हिडीओमध्ये कारच्या बोनेवटवर दिसणारा व्यक्ती त्याच्यापासून वेगळी झालेल्या पत्नीच्या कारवर उडी घेतो. त्यानंतर त्याच्यापासून वेगळी झालेली पत्नी ७० च्या स्पीडने कार चालवत आहेत. या कारच्या वेग इतका प्रचंड आहे की, व्हिडीओ बघताना पुढच्याच क्षणी अपघात होईल की काय असा भास होतो. दिलासा देणारी बाब आहे की संपूर्ण प्रवासादरम्यान त्या व्यक्तीने गाडीचे बोनेट घट्ट धरून ठेवले, त्यामुळे वाटेत तो कोणत्याही मोठ्या अपघाताचा बळी ठरला नाही. सध्या सोशल मीडियावर या ४३ सेकंदाच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचा श्वास रोखून धरला होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: फाळणीत दुरावलेले भाऊ-बहिण तब्बल ७५ वर्षांनंतर समोरासमोर, पाहा ‘तो’ भावनिक क्षण
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जो @NoContextHumans नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मुसळधार पावसात कारच्या बोनेटवर पडून दिसत आहे. गाडी चालवणारी महिला पूर्ण वेगाने गाडी चालवताना दिसत आहे.