Accident video viral: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात.हा व्हिडीओही याचंच एक उदाहरण, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्ध व्यक्ती घराबाहेरच्या एका कट्ट्यावर बसलेले दिसत आहेत. रस्त्याच्या कडेलाच घर असल्यामुळे वृद्ध एका बाजुला रस्त्याकडे बघत बसलेले आहेत. यावेळी अचानक एक कार त्यांच्या दिशेने येताना दिसत आहे. यावेळी वृद्द सतर्क होतात आणि तिथून बाजुला जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र कारचं निंयत्रण सुटल्यामुळे कार भरधाव वेगात वृद्धाकडे येते. बघताना असं वाटत आहे की, आता या धडकेत वृद्ध जखमी होऊ शकतात मात्र वृद्ध थोडक्यात बचावतात. हा व्हिडीओ पाहून एकच लक्षात येत आहे ते म्हणजे, “काळ आला होता पण वेळ आली नव्हती”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Lift accident: तुम्हीही लिफ्ट थांबवण्यासाठी हात बाहेर काढता? क्षणात झाले दोन तुकडे, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

दैव बलवत्तर म्हणून हे वृद्ध थोडक्यात बचावले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काही नेटकऱ्यांना अपघाताचे काय असावे असा अंदाज लावला तर काहींनी तो माणूस सुरक्षित असल्याबद्दल देवाचे आभार मानले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral man narrowly escapes death as car accident in front of him outside his home shocking video srk