Viral Video : डिलिव्हरी बॉयचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी डिलिव्हरी बॉयचा संघर्ष दिसून येतो तर कधी त्याच्याबरोबर गैरवर्तन करताना सुद्धा लोक दिसतात. खरं तर आपण अनेकदा डिलिव्हरी बॉयला गृहीत धरतो. कारण त्याचा संघर्ष आपल्याला कधीच दिसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयचा संघर्ष दाखवला आहे. हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे पण यातून डिलिव्हरी बॉयची चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक दुचाकी चालक दिसेल. जो रस्त्यावर पुढे गर्दी पाहून एका जणाला विचारतो, “दादा काय झालं पुढे एवढी गर्दी आहे.” तर समोरची व्यक्ती सांगते, “डिलिव्हरी बॉयचा अपघात झाला.” तेव्हा दुचाकीचालक विचारतो, “त्यालिव्हरी बॉयला खूप गडबड असते, बघा” त्यावर समोरची व्यक्ती म्हणते, “कस्टमर दंगा करते म्हटल्यावर डिलिव्हरी पोहचायला गेला आणि गेला गाडीखाली आणि एका डिलिव्हरीमागे असे किती मिळतात, २०-३० रुपये. २०-३० रुपयाच्या नादात गेला बघा” त्यानंतर समोरची व्यक्ती निघून ला खूप लागले का?” त्यावर समोरची व्यक्ती म्हणते, “खूप लागले म्हणजे जागेवरच गेला” दुचाकीचालक म्हणतो, “या डिजाते. दुचाकीचालकाला डिलिव्हरी बॉय बरोबरची त्याची चुकीची वागणूक आठवते. त्यातील तीन किस्से त्याला आठवते आणि त्याला वाईट वाटते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही डिलिव्हरी बॉयच्या संघर्षाची जाणीव होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप
u
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
veeruvajrawad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डिलिव्हरी बॉयचं आयुष्य”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “समाजातील वास्तव मांडतो तोच खरा कलाकार असतो समाजापुढे एक आदर्श ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद” तर एका युजरने लिहिलेय, “भावा डिलिव्हरी बॉयचं खूप अवघड असतं. काम करणं कारण मीही स्वतः हे डिलिव्हरी बॉयचं काम केलंय ट्रॅफिक मधून कसं बसं आपलं निघून सोसायटी मध्ये पोहचवावं लागतं. एका डिलिव्हरी मागे 30 रुपये मिळत असतात पण आपल्याला थोडे का होईना पैसे मिळतात. ते आपलं घर चालवण्यासाठी काम करावं लागतं. काय करणार आता” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप गरज होती ह्या video ची. असच करतात लोक, हे विसरतात की डिलिव्हरी बॉयवाला पण माणूसच आहे” एक युजर लिहितो, “खरं आहे भावा काळजाला लागलं. ५ वर्ष झोमॅटोमध्ये काम केलंय लोक खूप अपमान करतात. या मेसेज मधून तरी लोकांनी शिकावं आणि डिलिव्हरी बॉयचा आदर करावा.” अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.