पंजाबमधील पटियाला शहरात थुंकून तंदुरी रोटी बनवण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पटियालाच्या शेरन वाला गेटजवळील एका ढाब्याचा आहे. व्हिडीओ बघून असं वाटत की त्या कामगारालाही माहित आहे की त्याचा व्हिडीओ बनवला जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जेव्हा वाद झाला तेव्हा ढाबा मालकाने कर्मचाऱ्याची स्टाईल म्हणायला सुरुवात केली.

मात्र, आरोग्य विभागाने छापा टाकताच तो ढाबा बंद करून पसार झाला. आता पोलिसांनीही या संपूर्ण प्रकरणात कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोग्य विभागाशी संगनमत करून आरोपी कर्मचाऱ्याची आता चौकशी सुरू आहे.

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
AAP MLA Gurpreet Gogi
पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, लुधियाना डीएमसी रुग्णालयात प्राणज्योत मालवली
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’

(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)

तंदूरमध्ये रोटी टाकण्यापूर्वी थुंकत होता

रोटी लाटल्यानंतर कर्मचारी त्यावर थुंकून तंदूरमध्ये टाकत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्याचवेळी काही ग्राहकही तेथे उभे असतात. कर्मचाऱ्याचा व्हिडीओ बनवला जात असल्याचेही दिसत असतानाही तो बेधडकपणे हे कृत्य करत आहे.

(हे ही वाचा: शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral)

लोकांनी केला विरोध

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील लोकांनाही समजले की तो पटियाला येथील ढाब्याचा आहे. त्यानंतर संतप्त लोक तेथे पोहोचले. याबाबत त्यांनी ढाबा मालकासमोर आक्षेप नोंदवला. मात्र, आधी मालकाने टाळाटाळ केली आणि कर्मचाऱ्याची ही पध्दत आहे असं सांगितलं. वाद वाढल्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे मालकाने सांगितले.

(हे ही वाचा: बिबट्याने हल्ला करताच कुत्र्याने त्याचाच पकडला जबडा; थरारक Video Viral)

(हे ही वाचा: १० फुटांच्या अजगराशी खेळण्यासारखे खेळतोय २ वर्षाचा मुलगा; Video Viral!)

ढाब्यावर छापा

त्याचवेळी पटियालाचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रिन्स सोधी यांनी सांगितले की, हा व्हिडीओ त्यांच्याकडे आला आहे. याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करून ढाब्यावर छापा टाकला. त्यावेळी ढाबा बंद होता. मात्र, आरोग्य विभाग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. अशा प्रकारे कोणाच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

Story img Loader