VIDEO: सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायला होत असतात. त्यामध्ये मजेशीर व्हिडीओंचं प्रमाण जास्त आहे. काही मिनिटांचे हे मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांना खळखळून हसवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओंद्वारे नेटकरी आपली करमणूक तर करून घेतातच; पण असे काही प्रसंग असे असतात आपल्याबरोबरदेखील घडलेले असतात. मग असे व्हिडीओ पाहून आपल्याला त्या प्रसंगांची आठवण येते आणि आपणही त्या व्हिडीओमधील घटनेचा संबंध आपल्या आयुष्याशी जोडतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

हेही वाचा… धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?

व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये (VIDEO) आपण पाहू शकता की, एक गृहस्थ लिफ्टमध्ये आत जाऊन दरवाजा बंद केल्यावर त्याला ज्या मजल्यावर जायचंय त्या मजल्याचं बटण दाबतो. त्यानंतर पूर्ण वेळ त्याचं लक्ष त्याच्या मोबाईलमध्येच असतं. त्याचा मजला येताच लिफ्टचं दार काही उघडतच नाही. म्हणून हा गृहस्थ अनेकदा लिफ्टचं बटण दाबतो; पण दार उघडत नसल्याचं पाहून तो घाबरतो आणि कावराबावरा होतो. म्हणून मग लिफ्टचं दार हातानं उघडता येतंय का हेदेखील तो पाहतो. तितक्यात मागून एक माणूस त्या लिफ्टमध्ये अचानक येतो आणि हे पाहून त्या गृहस्थाला धक्काच बसतो. नंतर पाहतो तर काय त्या लिफ्टचं दार मागून उघडतंय आणि तोच उलट्या दिशेला उभा राहिला होता. हे पाहून त्याला समाधान नक्कीच मिळतं; पण लाखो लोकांच्या चेहऱ्यावर त्यामुळे हास्य नक्कीच उमटलं.

हेही वाचा… VIRAL VIDEO: संतापलेल्या बैलाचं भयंकर रूप! बैल मागे लागताच गावकरी चढला विजेच्या खांबावर पण पुढच्याच क्षणी…

हेही वाचा… नक्की आई कोण तेच समजेना? माय-लेकीचा तमिळ गाण्यावर जबदरस्त डान्स पाहून नेटकरी गोंधळात; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

हा व्हिडीओ (VIDEO) सीसीटीव्ही फुटेजमधून घेतल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ ‘log.kis.kisko.tokenge’ या अकाउंटवरून व्हायरल झाला आहे. “My brain is not braining” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “माझ्याबरोबरपण एकदा असंच झालेलं आणि तेव्हा मी गोंधळून गेलो होतो.” तर दुसऱ्यानं त्याच्या मित्राला टॅग करीत लिहिलं, “हे बघ असं तूपण केलेलंस ना.”