Video Viral: सोशल मीडियावर दररोज काही ना काहीतरी व्हायरल होत असतं. त्यात डान्सच्या व्हिडीओंचं प्रमाण अधिक आहे. अगदी लगानग्यांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत कित्येक जण लेटेस्ट गाण्यांवर थिरकताना दिसतात. हे व्हिडीओ व्हायरल होताच त्यांना प्रसिद्धी तर मिळतेच; पण त्यांच्या चाहत्यांची संख्याही वाढते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवर रील बनवणाऱ्या माय-लेकींचे व्हीडओ आपण अनेकदा पाहिले असतील. अशा व्हिडीओंमध्ये कधी मुलगी आपल्या आईला डान्स शिकवताना दिसते तर कधी आईला एखाद्या रीलमध्ये सहभागी करते. पण आता एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे तुम्ही नक्कीच गोंधळात पडाल.

हेही वाचा… धोतर नेसलं म्हणून वयोवृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; VIDEO VIRAL होताच घडली जन्माची अद्दल, पाहा नेमकं काय झालं?

सध्या एका माय-लेकीचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहताच त्यातली नक्की आई कोण आणि लेक कोण हे न समजल्याने लोक गोंधळात पडले आहेत.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या आई आणि लेकीने २००३ साली प्रदर्शित झालेल्या धनुष अभिनीत ‘Thiruda Thirudi’ या चित्रपटातील ‘Manmatha Raasa’ तमीळ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. माय-लेकीने या रीलसाठी हिरव्या रंगाचा मॅचिंग ड्रेस परिधान केला आहे. अगदी उत्तम डान्स स्टेप्स करीत दोघी एकमेकांसह थिरकताना दिसतायत. या दोघींची एनर्जी पाहून नेटकऱ्यांचा मात्र गोंधळ झालाय. त्यातली नक्की आई कोण आणि मुलगी कोण यावरून झालेल्या गोंधळातच नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतायत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करीत लिहिलं, “बालविवाहाचा परिणाम.” तर एक जण म्हणाला, “आई तर मुलीपेक्षा भारी डान्स करतेय.”

हेही वाचा… Viral Video: जीवावर बेतणार इतक्यात…, नौसेनेच्या माजी कमांडोने तरुणाला मरणाच्या दारातून ‘असं’ आणलं परत

एका युजरनं कमेंट करीत आईला “संतूर मम्मी”, असं म्हटलंय. तर “मुलीपेक्षा आई चांगली दिसते”, असं अनेकांचं म्हणणं आहे. “यातली नक्की आई कोण आणि मुलगी कोण”, अशीही कमेंट एका नेटकऱ्यानं या व्हिडीओवर केली आहे.

हेही वाचा… Viral Video: बहिणीबरोबर शाळेत गेलेला ४ वर्षांचा चिमुकला घरी परतलाच नाही; शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे घडलं ‘असं’ काही…

दरम्यान, ‘Adarsa & Dhanusree’ या मायलेकी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि नेहमी त्या वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकताना दिसतात. अनेकदा दोघी मॅचिंग कपडे घालून व्हिडीओ बनवतात म्हणूनच काहींना या दोघी जुळ्या बहिणी आहेत की काय, असंही वाटतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral of mother daughter dance on tamil song netizens confused dvr