Viral Video : एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला आनंद होतो. अनेकदा वस्तू खरेदी केल्यानंतर आपण पेढे सुद्धा वाटतो. तुम्ही दुचाकी किंवा एखादी कार खरेदी केल्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा केला असेल पण एका चहावाल्याने मोपेड खरेदी केल्यानंतर पेढे वाटले नाही; तर चक्क ६० हजारांची डिजे पार्टी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल या चहावाल्याने चक्क मिरवणुक काढली आहे आणि हा चहावाला ढोल ताशा आणि डिजेच्या तालावर नाचताना दिसत आहे. हौसेला मौल नसते, हे तुम्हाला या व्हिडीओवरून दिसून येईल.

मिरवणुकीसाठी केला ६० हजार रुपयांचा खर्च

हा व्हायरल व्हिडीओ मध्यप्रदेशातील आहे. मोपेड खरेदी केल्यानंतर चहावाल्याने केलेले जंगी सेलिब्रेशन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्याने एक मोपेड खरेदी केली आणि त्यानंतर ६० हजार रुपये खर्च करून डिजेच्या गजरात मोपेड घरी आणली. विशेष म्हणजे त्याने एक जेबीसी सुद्धा भाड्याने आणला आणि त्यावर त्याची मोपेड लटकवली जेणेकरून त्याचे कुटुंब आणि मित्र त्याने खरेदी केलेली गाडी बघू शकेल.

Election Commission of India holds a press conference in Delhi. Dates for Assembly elections in Jharkhand and Maharashtra
Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Shocking video Nilgai Calf Swallowed By Python Villagers Come To Rescue See What Happens Next Video Goes Viral
महाकाय अजगराने निलगायीला जिवंत गिळलं; गावकऱ्यांनी पोट दाबून पिल्लू काढलं बाहेर, VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
Harsh Goenka, Singapore Prime Minister Lawrence Wong
सिंगापूरच्या पंतप्रधानांचा ‘आम आदमी’ सारखा स्वस्तातला विमान प्रवास; प्रवाशांनी केलं टाळ्यांच्या गजरात स्वागत, पाहा Viral Video
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा
Ratan Tata Family Tree
Ratan Tata Family Tree : जमशेदजी टाटा ते नोएल टाटा; जाणून घ्या रतन टाटांची संपूर्ण वंशावळ!

हेही वाचा : “आयुष्य एवढं सहज मिळतं का?” स्टंट करताना खांबाला धडकला अन् थेट रुळाखाली गेला; अंगावर काटा आणणारा Video

२० हजारचा डाउन पेमेंट भरून लोनवर खरेदी केली मोपेड

हा चहावाला मध्यप्रदेशच्या शिवपुरी येथील आहे आणि त्याचे नाव मुरारी लाल कुशवाह आहे. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण त्याने ही मोपेड २० हजारचा डाउन पेमेंट भरून लोनवर खरेदी केली. तरीसुद्धा या हौशी चहावाल्याने डिजे आणि जेबीसी भाड्याने बोलावून जंगी मिरवणुक काढत मोपेड घरापर्यंत आणली ज्याच्यासाठी त्याने त्याच्या डाउन पेमेंटच्या तिप्पट पैसे मोजले.

पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला रस्त्यावरून जाणारी एक मिरवणुक दिसेल. चहा वाल्याने कोट घातला आहे आणि त्याच्या गळ्यात एक फुलांची माळ आहे आणि तो मिरवणुकीत डिजे आणि ढोलताशाच्या तालावर आनंदाने नाचताना दिसत आहे. तुम्हाला व्हिडीओत जेबीसी दिसेल. त्या जेसीबीला त्याने नवीन खरेदी केलेली मोपेड गाडी लटकवली आहे जेणेकरून सर्वांना ती दिसेल. त्याची मोपेड गाडी सुद्धा त्याने फुलांनी आणि फुग्यांनी सजवली आहे. त्याच्या या मिरवणुकीत त्याचे जवळचे लोकसुद्धा सहभागी झालेले दिसत आहे.

हेही वाचा : लेकीची छेड काढणाऱ्याला कुटुंबाने दिला बेदम चोप; VIRAL VIDEO चर्चेत, पण नेमकं सत्य काय?

चहावाल्याने एवढं जंगी सेलिब्रेशन का केले?

चहावाला सांगतो की त्याने हे जंगी सेलिब्रेशन त्याच्या मुलांना आनंदी करण्यासाठी केले आहे. “मला आनंद आहे की मी माझ्या कुटुंबासाठी हे करतोय. प्रत्येक आनंदोत्सव हा माझ्या मुलांना आनंदी करण्याचा मार्ग आहे.” त्याला प्रियंका नावाची मुलगी आणि राम आणि श्याम नावाचा मुलगा आहे.”

हे पहिल्यांदा नाही!!

यापूर्वी चहावाल्याने तीन वर्षांपूर्वी त्याच्या मुलीसाठी १२,५०० रुपयांचा मोबाईल खरेदी केला होता. मोबाईल घेतल्यानंतर त्याने सेलिब्रेशनसाठी २५,००० रुपये खर्च केले होते