नृत्य केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा आनंद साजरा केल्यासारखे वाटतच नाही. लोक छंद आणि आवड म्हणून नाचत असले तरी आनंद झाल्यावर आपले पाय आपोआपच थिरकू लागतात. आनंदाच्या प्रसंगी लोकांना उत्साहाने नाचताना अनेकदा पाहतो. आजकाल लग्नकार्यामध्ये तर हमाखास डान्स केला जातो. संगीतमध्ये नवरा-नवरीपासून वऱ्हाडी मंडळीपर्यंत सर्वजण गाण्याच्या तालावर थिरकताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशा एका मराठमोळ्या करवल्यांचा डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नाचा दिवस जितका नवरा-नवरीसाठी खास असतो तितकात त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील खास असतो. त्यामुळे लग्नामध्ये सर्वजण आनंदी दिसतात. कधी लाडक्या लेकाच्या किंवा लेकीच्या लग्नामध्ये आई-वडील आनंदाने नाचताना दिसतात. लग्नकार्य म्हटले करवल्या(नवरी किंवा नवरदेवाच्या बहिणी) कोणत्याच गोष्टीसाठी मागे हटत नाही मग डान्स असो किंवा दुसरे काही. सोशल मीडियावर अशाच काही करवल्यांचा डान्स व्हिडिओ चर्चेत आला आहे.

व्हिडीओमध्ये “या गो दांडावरना बोलते नवरा कुणाचा येतो” या मराठी गाण्यावर मराठमोळ्या करवल्यांनी डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये सर्वजणी लग्नाच्या हॉलमध्येदरवाज्यामध्ये नवरदेव उभा आहे. त्याच्या समोर दोन्ही बाजूने मराठमोळ्या पोशाखातील करवल्या उभ्या आहेत. नवरदेवाची एन्ट्रीला या करवल्या सुंदर डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या बोलावर त्या थिरकत आहे.

गाण्याचे बोले

“या गो दांड्यावरना बोलते नवरा कुणाचा येतो.
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजुक-साजुक,
त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साऱ्या
त्यांच्या डोईमंदी सायलींच्या गो येन्या
पायी पैंजण गो वाजती रुणझुण छुनछुन
त्या चालल्या गो चालल्या ठुमकत ठुमकत
त्यांचे व्हराडी गो व्हराडी फेटेवाले
त्यांचे यजमान गो यजमान चष्मेवाले
त्याचे भाऊबंद गो भाऊबंद घोडेवाले
त्यांनी उडविले उडविले दारुगोळे”

व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

इंस्टाग्रामवर manu_shinde19 नावाच्या पेजवर शेअर केला आहे. नवरदेवाची एन्ट्री असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओ आतापर्यंत ६३ हजारपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
एकाने कमेंट केली की, “नवरदेवाची एन्ट्री आहे की करवल्यांची, बाकी डान्स तर सुंदर आहे.”

दुसऱ्याने कमेंट केली की “अप्रतिम अद्भुत, विलक्षण, मनाला भिडणारी, उत्कृष्ट, अद्भुत नवरदेवाची एन्ट्री “

तिसऱ्याने कमेंट केली की, ” “नवरदेवाची एंट्री कमी आणि दोन्ही करवल्यांची एन्ट्री जास्त वाटते आहे. पण भारी एन्ट्री होती”

चौथ्याने लिहिले की, “धमाकेदार एन्ट्री”