विमान प्रवासादरम्यान प्रवाशांनी गैरवर्तन करण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. पण सध्या एका महिलेने विमानात केलेल्या असभ्य आणि किळसवाण्या वर्तवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोला जाणाऱ्या विमानात एका रशियन महिलेने चक्क अंगावरील कपडे काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जे पाहून अनेकजण त्या महिलेवर टीका करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मिळालेल्या माहितीनुसार विमान प्रवासादरम्यान, महिलेने कॉकपिटमध्ये जाण्याता प्रयत्न केला. यावेळी विमानातील क्रू मेंबर्संनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करताच महिलेने सर्वांसमोर आपले कपडे काढले आणि ती टॉपलेस झाली आणि या नग्न अवस्थेतच ती, मला कॉकपिटच्या आत जायचं असल्याचं म्हणू लागली. शिवाय ती उडत्या विमानातच सिगारेट ओढू लागली. धक्कादायक बाब म्हणजे क्रू कर्मचाऱ्यांनी तिला गैरवर्तन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताच ती एका सदस्याला चावली. महिलेच्या या विचित्र कृत्याचा व्हिडिओ मॅश या रशियन न्यूज वेबसाइटने शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतील महिलेचे नाव अॅन्झेलिका मॉस्कविटीना असल्याचं सांगण्यात येत आहे. तर स्टावरपोल (Stavropol) नावाचे विमान मॉस्कोला जात असताना हा सर्व प्रकार घडला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अँजेलिकाने आपला टॉप काढल्याचं दिसत आहे. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ ब्लर करण्यात आला आहे. या महिलेला विमानातील प्रवाशांनी सीटवर बसण्याची आणि कपडे घालण्याची विनंती केली तरीही तिने कोणाचेही ऐकलं नाही. दरम्यान फ्लाइट अटेंडंटने तिचे शरीर ब्लँकेटने झाकण्याचा प्रयत्न केला पण तिने ते ब्लँकेट काढून टाकल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
हेही पाहा- ऐकावं ते नवलच! ‘या’ कंपनीत गांजा पिणाऱ्याला मिळणार महिना ७ लाखांचा पगार; कसा ते जाणून घ्या
टॉयलेटमध्ये ओढत पित होती सिगारेट –
विमान प्रवासादरम्यान अँजेलिका विमानाच्या टॉयलेटमध्ये बसून सिगारेट पित होती. यावेळी विमान कंपन करू लागल्याने ती टॉयलेटमधून बाहेर आली. त्यानंतर तिने सर्व गोंधळ घातला. शिवाय ही महिलामला जिवे मारलं तरीही मी सिगारेट पिणार असं म्हणत होती. दरम्यान, विमान मॉस्को विमानतळावर उतरल्यानंतर या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. एअरलाइन कंपनी एअरफ्लोटच्या प्रवक्त्यानेही या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘महिलेला कॉकपिटमध्ये जाण्यास थांबवलं तरीही तिने वारंवार जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला कॅप्टनने बांधून ठेवण्याचे आदेश दिले.’