Viral video: वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात, त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण, सध्या सोशल मीडियावर दोन आजीबाई व्हायरल होत आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतो’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र, आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो, कारण व्हिडीओमध्ये आजी ज्याप्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. विशेष म्हणजे डोक्यावरचा पदर खाली पडू न देता या आजीबाईंनी बाप्पासमोर पारंपरिक नृत्य केलंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरात गणपती बाप्पा बसले आहेत. यावेळी दोन आजीबाई नऊवारी साडीत बाप्पासमोर पारंपरिक गाणी म्हणत नृत्य करत आहेत. विशेष म्हणजे या आजीबाई या वयातही उड्या मारत नाच करत आहेत, मात्र तरीही त्यांच्या डोक्यावरचा पदर खाली पडलेला नाही. या दोन्ही आजीबाईंचं वय झाल्याचं दिसत आहे, मात्र उत्साह हा तरुणाईला लाजवेल असाच आहे. सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण आहे अशातच गणपतीसमोर रात्रीचे हे जने खेळ खेळतानाचा आजीबाईंचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आज काल सगळेच मोबाईलवर गाणी लावतात आणि नाचतात मात्र या आजी स्वत: जुनी गाणी म्हणत म्हणत नाच करत आहेत.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्धाश्रमातल्या आजीबाईंचा तुफान डान्स; VIDEO पाहून विकी कौशलही भारावला; रिप्लाय एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर milind33192 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे डान्स केल्यामुळे आम्हाला आजींच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हटलंय, “डान्स केला आजींनी, पण पदर खाली पडू नाही दिला. यालाच तर म्हणतात संस्कार”, तर आणखी एकानं “अशी पिढी पुन्हा होणे नाही..वा… आज्जी, किती मस्त” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader